पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश


         केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या दहावी-2024 च्या निकालात पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.या शाळेतून एकूण 157 विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दिली होती त्यामध्ये 10 विद्यार्थ्यांनी 95%च्या पुढे गुण मिळवले तर एकूण 52  विद्यार्थी 90% च्या पुढे गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.तसेच 80 ते 90 % च्या मध्ये 62 विद्यार्थी तर 70 ते 79% च्या मध्ये 34  विद्यार्थी 60 ते 69% च्या मध्ये 9 विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले.

    पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे 10

 विद्यार्थी हे सर्वोच्च गुण मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये श्रावणी ढोलके व ऋषिकेश हुलकाने हे  विद्यार्थी 97.40 % गुण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत तर ओजल कोठारी,ऋग्वेद राऊत यांनी  97 % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तेजस पतंगे या विद्यार्थ्याने 96.80 % गुण मिळवून तृतीय तर अनुक्रमे मयुरी साखरे  96.60% व अंजली कुमारी 96.20%चौथा व पाचवा क्रमांक मिळवला तर सिध्दी जाधव, स्वयंम रेड्डी कोटगिरे, सोहम मारतळे या विद्यार्थ्यांनी  96% गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.

   विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशात शाळेच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन,शाळेचे वरिष्ठ समन्वयक श्री.जगन्नाथ ढेरे,माध्यमिक समन्वयक मोहसीन पठाण प्राथमिक समन्वयिका मीनाक्षी अय्यर ,शाळेचे व्यवस्थापक श्री.हरिदास रेड्डी व गोविंदसाई मखवाना शाळेतील तसेच शिक्षकवृंद, पालक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

  विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील भावनात्मक व संवादात्मक नाते,पालकांची शाळेप्रतीची विश्वासार्हता, विद्यार्थ्याची अपार मेहनत,या सर्वांचे फलित म्हणजे हे यश आहे आणि या बळावरच ही यशाची परंपरा अखंड अशीच चालत राहिल असा विश्वास शाळेच्या प्राचार्या डॉ.मालिनी सेन यांनी या वेळी व्यक्त करत उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील समृध्द जीवनासाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या