नवी मुंबई - सानपाडा येथील हरियाली व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, आयुष्यभर समाज उपयोगी कार्य करणारे पर्यावरण पुरस्कर्ते श्री. मारुती नाना कदम यांचा ५ मे २०२४ रोजी सातारा येथे त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी श्री दत्त संस्थान अक्कलकोट या संस्थेतर्फे विश्वगुरू ह. भ. प. नामदेव महाराज हरड यांच्या शुभ हस्ते " अमृत जीवनगौरव पुरस्कार " देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक भाईटे, कल्याण हनुमंत कुलकर्णी, बिपिन बिहारी दासप्रभू, क्षितेश्वर महाराज, स्वामी आनंदकाडसिद्धेश्वरानंद, प्रवीण भोसले महाराज, संग्राम बर्गे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मारुती कदम यांचा अमृत जीवनगौरव पुरस्कारने सन्मान
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा