२९ ते ३१ मे दरम्यान होणार परीक्षा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. कोर्सवर्क उन्हाळी-२०२४ परीक्षेचे आयोजन दि.२९ ते ३१ मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
पीएच.डी. कोर्सवर्कच्या परीक्षा विद्यापीठ परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहेत. यामध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुल आणि औषधनिर्माणशास्त्र संकुल, परभणी येथील शारदा महाविद्यालय आणि लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय या केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परिक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. २९ मे रोजी स. ११:०० ते दु. २:०० वा. दरम्यान रिसर्च मेथोडोलॉजी या विषयाची परीक्षा होणार आहे. दि. ३० मे रोजी स. ११:०० ते दु. १:०० वा. दरम्यान कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विषयाची परीक्षा होणार आहे. आणि दि. ३१ मे रोजी स. ११:०० ते १:०० दरम्यान रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स या विषयाची परीक्षा होणार आहे.
सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व संशोधक मार्गदर्शकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा