नांदेड प्रतिनिधी
प्रत्येक शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक जीवनात संशोधन केले
पाहिजे. कार्यकारणभाव समजतो असे प्रतिपादन लातूर विभागीय
शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी व्यक्त केले. ते नांदेड जिल्हा
जुक्टा संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कनिष्ठ
महाविद्यालयीन शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात बोलत
होते. अध्यक्षस्थासी. शामल प कुरुंदकर तर व्यासपीठावर नांदेड
शिक्षणाधिकारीमाधव सलगर, दिलीप बनसोडे प्राचार्य डॉ. बी यु गवई,
'यु
प्रा. नारायण शिंदे, मोतीभाऊ केंद्रे बोकारे होते
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असो प्रत्येक शिक्षकांनी
आपल्या कार्यकाळात संशोधनाचे काम केले पाहिजे, वेतन वाढ मिळो
अथवा न मिळो संशोधनाच्या कार्यातून प्रत्येकाला ज्ञानाचे आकलन
वाढत असते, कार्यकारण भाव समजत असतो त्या कारणाने आपण
आपल्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी संशोधनाचे काम केले पाहिजे.
नांदेड जिल्हा क म शिक्षक संघटना (जुक्टा) संघटनेने उत्कृष्ट
शिक्षकांसाठी आयोजित केलेला सत्कार समारंभ म्हणजे माझ्या मते
महाराष्ट्रातील हा पहिलाच कार्यक्रम आहे असेही त्यांनी गौरवोदगार
या प्रसंगी काढले प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट अशा शिक्षकांना निवड
करून यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम नांदेड
जिल्हा शिक्षक संघटनेने केले आहे असे मत मा. मोरे यांनी काढले
यानंतर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, सीए डॉ. प्रवीण
पाटील यांनी देखील आपले मनोगत मांडले त्यांनी पीएचडी करणे हे
सोपे झाले आहे पण ते काम सोपे ही नसून किंवा केवळ रोजच्या दहा
रुपयाच्या खर्चाप्रमाणे संशोधन होत नसते. पण त्यासाठी अलीकडे
पीएचडीला किंवा संशोधनाला इतके महत्त्व राहिले नाही मी डॉक्टर
आहे असे अमुकाने सांगणे ते तितके वाजवी नाही असे मत पाटील
आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी क म शिक्षकांना शाल
स्मृतीचिन्ह देऊन यथोचीत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी
जिल्ह्यातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षिका उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कदम तरआभार गाढवे यांनी मानले
या कार्यक्रमास प्रा. महेश मोरे महेश देशमुख, प्रा. डॉ धनराज लझडे,
प्रा. डॉ. प्रकाश कुकाले, प्रा. डॉ. जयराज वडजे प्रा. डॉ शिऊरकर
मॅडम, प्रा. महेश कुडलीकर आदी उपस्थित होते

addComments
टिप्पणी पोस्ट करा