शाहीर सुखदेव कांबळे कायम रसिकांच्या स्मरणात रहातील!* *_दिवंगत लोकशाहिरांना कलावंतांची श्रध्दांजली_*

   मुंबई दि.२०: प्रतिभावंत स्व.शाहीर आत्माराम पाटील यांच्या सुरेल रचना रसिकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचविणारे शाहीर सिकंदर शेख, शाहीर मधु मोरे,शाहीर कृष्णकांत जाधव यांच्यानंतर शाहीर सुखदेव कांबळे हे एक संस्मरणीय शाहीर होत.शाहिरी लोककले पलीकडेही अंडीअडचणीतील सहकलाकारांना मदतीचा हात देणारे शाहीर सुखदेव कांबळे कायम रसिकांच्या हृदयात राहतील,अशा भावपूर्ण शब्दांत नाटककार ज्ञानेश महाराव यांनी दिवंगत शाहीर सुखदेव कांबळे यांना येथे श्राद्धांजली वाहिली.

    जुन्या काळातील एक लोकप्रिय शाहीर सुखदेव कांबळे यांचे गेल्याच आठवड्यात आकस्मिक निधन झाले(वय ७४).त्यांच्या कला जीवनातील निरलस आठवणींना उजाळा देण्यासाठी कांबळे कुटुंबीय आणि शाहीरी लोक कलावंत मंचच्या वतीने गं.द.आंबेकर मार्गावरील 'लॅंडमार्क टॉवर' मधील मिनीथिएटरमध्ये श्रध्दांजली कार्यक्रम आयो जित करण्यात आला होता.त्यावेळी सुखदेव कांबळे यांच्या स्मृतींना उजाळा देताना ज्ञानेश महाराव म्हणाले,काळी चार पासून गाणे सुरू करणा-या शाहीर सुखदेव कांबळे यांनी आपल्या चमकदार व्यक्ती मत्वातून गाण्यात चैतन्य‌ निर्माण केले.लोक कलेचे विपुल तपशील गाठीशी बाळगणा-या शाहीर सुखदेव कांबळे यांनी अपार कष्टातून लोक कला जोपासली.जगण्याची आस आसणारे सुखदेव आकस्मिक आपल्यातून निघून गेले,याची खंत सर्वांना वाटत‌ रहाणार आहे,असे नाटककार ज्ञानेश महाराव दिवंगत शाहीर सुखदेव कांबळे यांना श्रद्धांजली वाहतांना आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.

    शाहीर सुखदेव कांबळे यांच्या कन्या पार्श्वगायिका डॉ.शिल्पा मालंडकर आणि पुत्र पुरुषोत्तम कांबळे यांनी प्रारंभी पित्याच्या कला जीवनातील अभूतपूर्व आठवणींना उजाळा दिला.यापुढे त्यांची जयंती लोक कलेतील गरीब कलावंताच्या मदतीने संपन्न होईल,असा संकल्प कांबळे कुटुंबियांच्या वतिने जाहीर करण्यात आला.शाहीर सुखदेव कांबळे यांच्या प्रतिमेला प्रथम फुले वहाण्यात आली.श्रीमती सुखदेव कांबळे त्या वेळी उपस्थित होत्या. 

     त्या प्रसंगी शाहीर मधू खामकर म्हणाले,शाहिरी लोक कला पुनर्स्थापित करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!संगीतकार मनोहर गोलांबरे आणि प्रशांत ठाकरे म्हणाले,थोर कलाकाराची कलेतील थोरवी कायम स्मरणात रहाण्यासाठी 'डॉक्युमेंटेशन' स्वरूपात त्यांची कला जोपासावी लागेल.कथालेखक आणि शाहिरी लोक कला मंचचे समन्वयक काशिनाथ माटल म्हणाले,शाहीर सुखदेव कांबळे लोककलेती अनेक अभ्यासकांचे 'ज्ञानपीठ' होते.पत्रकार खंडू गायक वाड म्हणाले,शहरा पासून खेड्यापाड्यातील कलावंताना आज वाढीव मानधन मिळणार आहे,या पाठिमागे शाहीर सुखदेव कांबळे यांचे‌ पयत्न मोलाचे ठरले‌ आहेत. 

    शाहीर शांताराम चव्हाण,शाहीर दत्ता ठुले,शाहीर आनंद सावंत, गाढवाचे लग्न' फेम शाहीर कमलाकर पाटील,युवा शाहीर निलेश जाधव, ऑक्रेस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव,चंदू पांचाळ,स्त्री ढोलकी पटू देवयानी,शाहीर स्व.चंदू भराडकर यांच्या कन्या स्वरिता पाटकर, कलाकार मेडिकल हेडचे नंदकिशोर मसुरकर आणि ग्लोरिया डिसोझा आदींनी श्रध्दांजलीच्या भाषणात सुखदेव कांबळे यांच्या कला जीवनातील पैलूंवर प्रकाश झोत टाकला. 

    संगीतकार अशोक वायंगणकर, वयोवृध्द गिरणीकामगार संगितकार महादेव खैरमोडे,नृत्यतारका सुरेखा काटकर, माणिक मयेकर, पार्श्वगायिका गिता गोलांबरे,प्रसिद्ध ढोलकीपटू ज्ञानेश्वर ढोरे, विजय चव्हाण,कृष्णा मुसळे आदी विविध क्षेत्रातील नामवंत श्रध्दांजली कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज