नृसिंह चाटे, साक्षी देवकते, आद्या,ओवी बाहेती, स्मित करेवार, अद्वैत,आरुषी पांचाळ यांनी विजेते ठरले
परभणी (. ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन मान्यतेने परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन वतीने आयोजित कै. रमेश पारे यांच्या स्मरणार्थ मराठवाडा मानांकन विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी चे वर्चस्व राहिले.
लातूर च्या आरुषी पांचाळ हिने बाजी मारली.
दि. २मे रोजी अंतिम लढतीत चुरशीच्या होऊन बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यात प्रसंगी राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा सचिव तथा राज्य सदस्य गणेश माळवे, प्रा.मदनसिंग ठाकुर, डॉ. महेश बाहेती, डॉ.श्रीकांत मणियार, राहुल पारे,गौस पठाण माजी राष्ट्रीय खेळाडू आदी मान्यवरांच्या वतीने रोख 39,900/- पारितोषिक व प्रमाणपत्र ,ट्रॉफी देण्यात आली.
स्पर्धेत मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, येथील १५० खेळाडूंचा सहभाग होता.
अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:-
11 वर्ष मुले :-अद्वैत मणियार विजयी वि. निंरज नांदेडे (3-2) सेट मध्ये अद्वैत मनियार विजयी.
11वर्ष मुली आरुषी पांचाळ (लातूर) वि.श्राव्या पवार (परभणी) (3-1)आरुषी पांचाळ विजयी.
13वर्ष मुली
आद्या बाहेती ( परभणी) वि शरयू टेकाळे परभणी (3-1) सेट मध्ये आद्या बाहेती विजयी ठरली.
13वर्ष मुले :- गौरांग वैजवाडे (परभणी )वि रुद्र टाक परभणी(3-1)सेट मध्ये गौरांग वैजवाडे विजयी ठरला.
15 वर्ष मुले :-युवराज सवणे (परभणी ) वि. गौरांग वैजवाडे परभणी (3-1) दरम्यान युवराज सवणे विजयी ठरला.
15वर्ष मुली:- शरयू टेकाळे (परभणी ) वि अनुष्का कोठारी बीड (3-0) शरयु टेकाळे विजयी ठरली.
17 वर्ष मुले :-स्मित करेवार (परभणी ) वि. युवराज सवणे परभणी (3-1) स्मित करेवार विजयी ठरला.
17 मुली :-ओवी बाहेती (परभणी ) वि अनुष्का कोठारी बीड. (3-1)ओवी बाहेती विजयी ठरली.
19 वर्ष मुले :-स्मित कारेवार (परभणी) वि. राजवर्धन शिनगारे (बीड) (3-1)स्मित करेवार विजयी ठरला.
19वर्ष मुली:-ओवी बाहेती (परभणी )वी. अनुष्का कोठारी (बीड). (3-0) ओवी बाहेती विजयी ठरली.
महिला :-साक्षी देवकते (परभणी) वि . आद्द्या बाहेती( परभणी) (3-1)साक्षी बाहेती विजयी ठरली.
पुरुष:-नरसिंह चाटे (परभणी) वि. अनुज कवठेकर (परभणी) (3-0)
नृसिंह चाटे विजयी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले तर सुञसंचलन रोहित जोशी आभार प्रदर्शन चेतन मुक्तावार यांनी मानले.
पंच प्रमुख गौरव फन्साळकर,
स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. अजिंक्य धन, श्रीकांत दुधारे, निखिल झुटे, विजय अवचार, रोहित जोशी, धीरज देशमुख, नृसिंह चाटे,सुरज भुजबळ, स्वप्निल आरसुळ आदी नी परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा