कालच्या इंटक कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार!*

    मुंबई दि‌.१७: परिवर्तन ही काळाची गरज ओळखून कामकारांचे खच्चीकरण करणा-या सरकाला सत्तेवरुन दूर करण्यासाठी, इंडिया आघाडी,माहाविकास आघाडीच्या मुंबईतील सहाही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते, पुणे शहर संपर्क प्रमुख,माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर यांनी कामगार मेळाव्यात बोलताना केले. तर खास‌ दिल्ली वरून मेळाव्यास उपस्थित असलेले भारतीय कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश कॉंग्रेसेचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांनी आपल्या भाषणात, पुंजीपतीचे‌‌ लांगूलचालन करणा-या या सरकाला सत्तेवरुन खाली खेचा! असे आवाहन केले.

   महाराष्ट्र इंटकचा "कार्यकर्ता मेळावा"काल दादरच्या टिळक भवनात पार पडला,त्यावेळी शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर मुख्यअतिथी‌ म्हणून बोलत होते.तर भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीतला,मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते.

    कामगार शेतकरी वर्गाचा गळा घोटणारे हे मोदी सरकार‌ आहे, असे सांगून रमेश चेन्नीतला म्हणाले,नरेंद्र मोदी सरकार अदानी,अंबानी उद्योग पतींच्या भल्याचा विचार करतात.परंतू‌ देशातील कामगार, शेतकऱ्यांना मात्र आपल्या हक्कासाठी रस्त्यावर यावे‌ लागत आहे. यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा सर्वच कॉंग्रेस प्रणीत सरकारने प्रथम कामगार आणि शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून देशाची धोरणे‌ राबविली‌ आहेत. देशातील कायदे आज जणू पुंजीपतींच्या भल्यासाठी असल्या सारखी परिस्थिती आहे. कॉंग्रेसनेते राहूल गांधी यांनी देशभर यशस्वी शांतीयात्रा राबविली  तिला मिळालेला सर्वसामान्यांचा प्रतिसाद हीच कॉंग्रेसची ताकद ठरली आहे.या देशातील कष्टकरी कामगार, बळीराजा ला सुखी करायचे असेल तर या सरकारला सत्तेवरून दूर करावे‌ लागेल.त्या साठी इंडिया आघाडीच्या मुंबईतील सहाही उमेदवारांना विजयी करण्याचे कॉंग्रेसनेते रमेश चेन्नीतला यांनी इंटक कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन केले.

   आमदार सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, केंद्राने कामगारहिताचे कायदे मोडीत काढून कामगार विरोधी"फोर कोड बिल'"संमत केले.त्याला काळा कायदा संबोधला जातो.कोविडच्या आडोशाने महाराष्ट्रासह देशभरातील २३ गिरण्या बंद केल्या,या सर्वांकडे दुर्लक्ष करणारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल मात्र आज खुशाल निवडणूक लढवित आहेत,या सरकारला हीच वेळ आहे,धडा शिकवण्याची,असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.

     इंटक कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेश काँग्रेसचे (संघटन- प्रशासन)उपाध्यक्ष नाना गावंड, मुख्यप्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक प्रगती अहिर आदी उपस्थित होते.महाराष्ट्र‌ इंटक अध्यक्ष कैलास कदम यांनी प्रास्ताविकात तर सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आभाराच्या भाषणात कामगार विरोधी सरकारवर कडाडून टीका केली. 

    महाराष्ट्र इंटकच्या वतीने, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे मुंबईतील लोकसभा उमेदवार १)वर्षा गायकवाड, उत्तर मध्य मुंबई २) अरविंद सावंत, दक्षिण मुंबई ३)संजय दीना पाटील इशान्य मु़बई,४) भूषण पाटील, उत्तर मुंबई ,५) अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई आणि ६) अमोल किर्तीकर, उत्तर पश्चिम मुंबई या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.

   या प्रसंगी कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई‌ व नंदू खानविलकर, इंटक मुंबई अध्यक्ष दिवाकर दळवी, सहाय्य सेक्रेटरी जी.बी.गावडे, दादाराव डोंगरे,अमित भटनागर,भाग्यश्री भुर्के आदींची भाषणे झाली.सेक्रेटरी मूकेश तिगोटे यांनी प्रास्ताविकात आपल्या भाषणात मोदीं सरकारला हाद्दपार करण्याचे आवाहन केले••••••••

टिप्पण्या