भाविकांना ऊन वारा पावसापासून मिळाले संरक्षण श्री रेणुका माता मंदिरावर जाणाऱ्या 225 पायऱ्यावर शासनाने बनविले टीन शेड

 


श्रीक्षेत्र माहूर

श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरावर जाणाऱ्या 225 पायऱ्यावर शासनाकडून 70 ते 80 लाख रुपये खर्च करून टीन शेड उभारल्याने मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे ऊन वारा पावसापासून संरक्षण झाल्याने भाविकासह विश्वस्त पुजारी मंडळाकडून शासनाचे अभिनंदन होत आहे


श्री रेणुका माता मंदिरावर जाण्यासाठी भाविकांना 225 पायऱ्या चढून जावे लागते वृद्ध अपंग भाविकांना या बाबीचा मोठा त्रास होत होता त्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी 51 कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट आणि स्काय वाक प्रकल्पाला मंजुरी दिल्याने लिफ्ट आणि स्काय वाक चे काम सुरू झालेले आहे त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून पायऱ्या द्वारे वर जाणाऱ्या भाविकांना पायऱ्यावर टीन शेड नसल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी आपापल्या परीने पोते नेट बांधून सावली करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या नेट आणि फाऱ्या पोते  बांधलेल्या असल्याने दोन वेळा आग लागून दुकाने भस्मसात होण्याच्या घटना घडल्या होत्या

भाविकांना त्रास होऊ नये म्हणून श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांचे सह सर्व विश्वस्तांनी शासनाकडे पायऱ्यावर टीन शेड उभारण्याची मागणी केली होती परंतु या बाबीकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले होते शासनाकडून संस्थांनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि विश्वस्तांनी यावेळी मागणी रेटून धरल्याने पायऱ्यावर टीन शेडचे बांधकाम पूर्ण झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना ऊन वारा पावसामुळे होणारा त्रास कमी झाल्याने विश्वस्त तथा पुजाऱ्याकडून वेळेत काम पूर्ण झाल्यामुळे भाविकांना होणारा त्रास कमी झाल्याने अभिनंदन करण्यात आले आहे

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज