कर्तव्य निष्ठ बॅक अधिकारी संजय गणपतरावं मगर सेवानिवृत्त

 

 गेल्या 33 वर्षापासून परभणी जिल्ह्या मध्यवर्ती बँके सेलूत बजावली सेवा 

 सेलू  ( प्रतिनिधी ) सेलू येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शहर शाखेचे शाखा व्यवस्थापक संजय गणपतराव मगर हे आज सेवानिवृत्त झाले आहेत.

 त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी नूतन विद्यालय सेलू येथील प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, नारायण सोळंके, डी.डी. सोन्नेकर, गणेश माळवे, परशुराम कपाटे, किशोर कटारे, प्रशांत नाईक, वीरेंद्र धापसे, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे, अनंतकुमार विश्वंभर,कृष्णा रोडगे, प्रसाद  कायंदे, केशव डहाळे यांची उपस्थिती होती.

        संजय मगर यांनी 1990 साली परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत  सेवेस प्रारंभ केला त्यांनी आतापर्यंत वालूर, धामणगाव, मोरेगांव आणि सेलू शहरात 1994 पासून ते कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तव्य निष्ठेने, दिल खुलास स्वभावामुळे व तत्पर सेवेमुळे ते सर्वच शाळेतील शिक्षकांशी मैत्रीपूर्ण नाते जपतात. त्यांची एकूण 33 वर्षे सेवा झालेली आहे. आज त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सेलू तालुक्यातील शिक्षकाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज