स्नेहसंमेलन हा तरुणाईचा जल्लोष असतो; मात्र हा जल्लोष जाण आणि भान ठेवून साजरा करावयास हवा. मनोरंजनाला निश्चितच मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे; मात्र मनोरंजनाला प्रबोधनाची किनार असावयास हवी.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सबंध महाराष्ट्रभर स्नेहसंमेलनाचा उत्सव संपन्न करण्याकडे युवक युवतींचे लक्ष असते. एका बाबीचा उल्लेख करणे आवश्यक वाटते, बऱ्याचदा या स्नेहसंमेलनास गालबोट लावल्या जाते. उत्सव साजरा करण्याच्या नादात उत्साहावर विरजन पडल्याची अनेक उदाहरणे समोर येताना दिसतात. केवळ मराठी व हिंदी चित्रपटातील गीते आणि त्यावरील धांगडधिंगा (नृत्य शब्दाऐवजी हा शब्द आता जास्त प्रचलित होतोय) म्हणजे स्नेहसंमेलन नसते; तर शैक्षणिक संकुलामध्ये मर्यादांचे भान आणि सामाजिकतेची जाण ठेवून आपल्यातील विविध कलाप्रकारांचे सादरीकरण हा व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाचा पैलू आहे. मात्र केवळ व निव्वळ घोषणा, आरडाओरड, कर्ण कर्कशता या बाबी घडून येत असल्यास त्याला स्नेहसंमेलन कसे म्हणता येईल?
या सर्व बाबींना तिलांजली देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी जून २०१९ मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा स्वीकारल्यानंतर स्नेहसंमेलनाला सूजनात्मक, रचनात्मक व संशोधनात्मक स्वरूप दिले.
कोणताही उत्सव हा स्मरणात राहावा. त्याची आठवण झाल्यानंतर मन प्रफुल्लित व्हावे आणि चेहरा हास्यमय व्हावा. (आपले हसू होऊ नये) अशा पद्धतीने स्नेहसंमेलन संपन्न व्हावे म्हणून यशवंत युवक महोत्सव या शीर्षकाखाली पोस्टर सादरीकरण, शोधनिबंध सादरीकरण, मॉड्युल सादरीकरण, रांगोळी, क्रीडा स्पर्धा आणि देशभक्तीपर आणि सुगम गीत व शास्त्रीय संगीत सादरीकरण सोहळा असे स्वरूप त्याला दिलेले आहे.
२०१९ पासून दरवर्षी नवनवीन संशोधनात्मक, प्रबोधनपर आणि राष्ट्रभक्ती व प्रेम जागविणारे विषय या महोत्सवास देऊन विद्यार्थ्यांमधील लेखक, संशोधक, कलावंत जागृत व्हावा; ही अपेक्षा या मागील आहे. आजवर झालेल्या सर्व यशवंत महोत्सवांमधून हे सिद्धही झाले आहे.
विद्यमान शैक्षणिक वर्षी दि. ४ मार्च ते १२ मार्च दरम्यान यशवंत युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शोधनिबंध सादरीकरणासाठी 'शाश्वत विकासाची ध्येय', पोस्टर सादरीकरणासाठी 'भारतीय प्रजासत्ताकाची अमृत महोत्सवी वाटचाल', आणि 'विज्ञान व तंत्रज्ञान, मानव विज्ञान विद्या शाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील आधुनिक प्रवाह' हे विषय आणि मॉड्युल सादरीकरणासाठी, 'विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्य विज्ञान विद्या शाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील आधुनिक प्रवाह' रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व देशभक्तीपर गीते सुगम व शास्त्रीय गीते नृत्य वाद्य संगीत याचे सादरीकरण ठेवण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक उपक्रम ज्ञानामध्ये भर टाकणारा असावा. त्याद्वारे सृजनशीलता, उपक्रमशीलता वृद्धिंगत व्हावी; म्हणून असे स्नेहसंमेलन संपन्न झाल्यास विद्यार्थ्यांना प्राप्त होणारी ही शिदोरी आयुष्यभर उपयुक्त ठरत असते.
या युवक महोत्सवाची संकल्पना व निर्मिती प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांची असून यावर्षी या युवक महोत्सवाचे समन्वयक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय ननवरे आहेत.
शोधनिबंध सादरीकरणाचे समन्वयक डॉ.एम.एम. व्ही.बेग असून सदस्य डॉ.अजय मुठे, डॉ.विश्र्वाधार देशमुख, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ. श्रीकांत जाधव, प्रा.भारती सुवर्णकार आणि डॉ.मोहम्मद आमेर आहेत.पोस्टर सादरीकरणाचे समन्वयक डॉ.नीरज पांडे असून सदस्य डॉ.शिवराज बोकडे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ.धनराज भुरे, डॉ. मदन अंभोरे, प्रा. पी.पी.सिसोदिया आणि डॉ.राजरत्न सोनटक्के आहेत. मॉड्युल सादरीकरणाचे समन्वयक डॉ.प्रवीण मिरकुटे असून सदस्य डॉ.वनदेव बोरकर, प्रा.ए.आर.गुरखुडे, प्रा.पी.आर.चिकटे, डॉ.निलेश चव्हाण, प्रा.माधव दुधाटे, डॉ.साईनाथ बिंदगे आणि प्रा.सोनाली वाकोडे आहेत. क्रीडा स्पर्धेचे समन्वयक डॉ. मनोज पैंजणे असून सदस्य डॉ. रामराज गावंडे, डॉ.बालाजी भोसले, डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.कविता केंद्रे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, प्रा.ए.आर.गुरखुडे, डॉ. दीप्ती तोटावार आहेत. गीत संगीत सादरीकरणाचे समन्वयक डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव असून सदस्य डॉ. शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.विश्वाधार देशमुख, प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.सुभाष जुन्ने, आणि डॉ.डी.एस.कवळे आहेत. रांगोळी स्पर्धेच्या समन्वयक डॉ.नीताराणी जयस्वाल असून सदस्य डॉ.मंगल कदम, डॉ.ए.के.गोरे, डॉ.एस.बी.वानखेडे, डॉ. रत्नमाला मस्के, प्रा.पी.पी.सिसोदिया, प्रा.राजश्री जी.भोपाळे आहेत. प्रमुख अतिथी व्यवस्थापन, नियोजन आणि प्रसिद्धी समितीचे समन्वयक डॉ. अजय गव्हाणे असून सदस्य डॉ.संजय जगताप,, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.शिवराज शिरसाठ, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, अधीक्षक गजानन पाटील व कालिदास बिरादार आहेत आणि प्रमाणपत्र व बक्षीस वितरणाचे समन्वयक डॉ.श्रीकांत जाधव असून सदस्य डॉ.प्रवीण तामसेकर, प्रा.नितीन नाईक आणि डॉ.पी.बी.पाठक आहेत.
युवक महोत्सव केवळ विरंगुळा न ठरता युवकांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करणारा असावा; तरच अशा स्नेहसंमेलनातून स्नेह वृद्धिंगत होत असतो.
यालाच काव्यमय स्वरूप द्यावयाचे असल्यास असे म्हणता येईल......
*स्वतःच्याच विचारांच्या फवाऱ्यात नहाता आले तरी पुरेसे आहे*
*कुणाला चंद्र तारे तोडून देण्यापेक्षा*
*माणुसकीने ग्लासभर पाणी देता आले तरी पुरेसे आहे*
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड
---------------------------------------------------
addComments
टिप्पणी पोस्ट करा