दलित मित्र स्वर्गीय राम भारती पिंपरखेडकर अनंतात विलीन

 

_दलितमित्र *स्व.राम गणपत भारती महाराज* (पिंपरखेडकर) महाराष्ट्र शासनाचे दलितमित्र पुरस्कार विजेते तथा अध्यक्ष,महाराष्ट्र दशनाम गोसावी संघ तथा माजी संचालक मराठवाडा साखर कारखाना,डोंगरकडा_

. समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष

   _यांचे आज दि.8/12/2023 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले, त्यांचे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय चळवळीत उल्लेखनीय कार्य आहे, नांदेड दशनाम गोसावी समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाज संघटीत व्हावा यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. 1959 ची ग्रामीण भागात शाळा काढण्याची श्रेय त्यांना जाते.

समाजाच्या उन्नतीसाठी जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता .. गोरगरीब लोकांसाठी काम करण्यात त्यांना आनंद होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री मा.शंकरराव चव्हाण यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते.काँग्रेस पक्षात सर्वाधिक दीर्घकाल त्यांनी पक्ष बांधणीसाठी नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केले . दि. 8 डिसेंबर 2023 रोजी उमरखेड मला कॉर्नर येथे त्यांचा सर्व पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला सदरील अंत्यविधीसाठी, माझी उपजिल्हाधिकारी भगवान भारती , माजी राज्यमंत्री माधवराव पाटील किनाळकर ,माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता ताई पाटील, खासदार शिवाजी माने, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख , अनिल पाटील बाभळीकर , राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक राठोड सर, माजी नगराध्यक्ष बालाजी तोष्णीवाल, काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष आनंद भंडारी ,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष तथा सभापती शामराव चव्हाण, संभाजी लांडगे माजी जिल्हा परिषद सदस्य, बाबुराव कदम कोळीकर, वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष शिवभाउ नारंगले, माजी जि प सदस्य दिलीप बाष्ठेवाड, माहूर मठाचे श्याम भारती महाराज, आणि केदारनाथ मठाचे महंत मृत्युंजय भारती महाराज, काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर पाटील रुईकर, माजी नगराध्यक्ष अमित अडसूळ, भाजपचे तालुकाध्यक्ष तात्याराव पाटील वाकोडे, माजी मुख्याध्यापक व्ही.के. राणे. राजकीय सामाजिक कृषी शिक्षण क्षेत्रातील समाजसेवक कार्यकर्ते आणि कर्मचारी यांची लक्षवेधी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी साहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून शब्द सुमनाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

  समाज सेवकास सर्व दशनाम गोसावी समाज सेवाभावी मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण!

टिप्पण्या