टेनिस व्हॉलीबॉल खेळायला आरक्षण मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु: बिपिन जगताप.

 राज्य टेनिस मिनी/युथ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन


ठाणे(. ‌‌. ) मराठमोळ्या महाराष्ट्रीयन टेनिसव्हॉलीबॉल खेळास आश्रयदाते ची आवश्यकता आहे. तो मिळून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडू गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. या खेळाडूंना आरक्षण व अनुदान मिळाले पाहिजे. असे प्रतिपादन बिपिन जगताप यांनी केले.

          टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने, मुंबई विभाग व ठाणे जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २५ वी राज्य मिनी/युथ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा डोंबिवली येथील चंद्रेश लोढा मेमोरियल स्कुल 

दि. १६ डिसेंबर, सांय ०४ वा.

बिपिन जगताप (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष स्थानी टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, महेंद्र धर्मा पाटील (भाजपा शहराध्यक्ष ) गणपतराव बालवडकर (राज्य चेअरमन) गणेश माळवे (राज्य सचिव) डॉ. दिनेश शिंगारम (राज्य कोषाध्यक्ष) संजय ठाकरे (राज्य सदस्य) रामेश्वर कोरडे, अशोक शिंदे (विभागीय सचिव) आदी मान्यवर उपस्थित होते. 

        स्पर्धेत महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील ३०० मुले/मुली खेळाडूंनी सहभागी झाले आहेत. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. मुकुल आव्हाड तर आभारप्रदर्शन अनिल घुगे यांनी केले.

टिप्पण्या