डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे महान नेते आहेत-प्रा.डॉ.आर.डी.शिंदे*


नांदेड: ( दि.६ डिसेंबर २०२३)

           भारताला देश म्हणून चेहरा देणाऱ्या १९२० ते १९५६ या काळात ज्या काही चळवळी आणि आंदोलने झाली; त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय होते. सर्व जाती-जमाती आणि धर्मातील शोषितांना आत्मसन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आपल्या कार्यातून आणि लेखणीतून विद्रोह केला. त्यांच्या विचार आणि कार्याला विशिष्ट जात,धर्म आणि राज्यांच्या सीमा नव्हत्या. सर्व जाती आणि जमातीच्या उत्थानासाठी लढणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारत देशाचे महान नेते आहेत; असे प्रतिपादन लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.आर.डी. शिंदे यांनी केले.

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलितेत्तर समाजासाठीचे कार्य' या विषयावर ते बोलत होते. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते. 

          प्रारंभी प्रास्ताविक व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संदीप पाईकराव यांनी केले. 

           पुढे बोलताना प्रा.डॉ.आर.डी.शिंदे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धोरण तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम हा ज्या देशाचा मुख्य अजेंडा होऊ शकतो, कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, कामगार आणि शेतकरी वर्गाबरोबरच स्त्री-उद्धाराचे महनीय कार्य केले. स्मृती, पुराणे आणि उपनिषदांत सामान्यांचा जो इतिहास दडला आहे, त्यातील कल्पिते वजा करून इतिहासाची पुनर्मांडणी करत दीन-दलितांना आत्मभान दिले. मध्ययुगीन सामंती मूल्यांना नाकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय अशा मानवी मूल्यांवर आधारित देशात लोकशाही व्यवस्था कायम करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. लोकशाहीला अनुरूप संविधान दिले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महान नेते आहेत.

           अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे कालजयी स्वरूपाचे असून त्यांचे विचार आणि कार्य आजही देशाला मार्गदर्शक ठरतात. 

          या प्रसंगी विचारपीठावर उपप्राचार्या डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.संदीप पाईकराव उपस्थित होते. 


           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी समिती सदस्य प्रा.गौतम दुथडे, डॉ.मिरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.कैलास वडजे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.अजय टेंगसे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.व्ही.सी.बोरकर, डॉ.अर्चना गिरडे, प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.संजय ननवरे, डॉ.संतोष मोरे, डॉ.संजय जगताप, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.एस.एम. दुर्राणी,प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.धनराज भुरे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.डी.डी.भोसले, डॉ.अजय मुठे, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रा.एस.एन.शेळके, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ. प्रविण तामसेकर आदी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या