बक्षीस वितरण माजी सैनिक मेजर राजकुमार बागल यांच्या हस्ते
ठाणे(. . )
टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने, मुंबई विभाग व ठाणे जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २५ वी राज्य मिनी/युथ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा डोंबिवली येथील चंद्रेश लोढा मेमोरियल स्कुल . मैदानावर मिनी/युथ मुले गटात ठाणे जिल्ह्यांनी विजयी तर मुलीच्या गटात बीड जिल्हा तर मिनी मिश्र दुहेरीत पुणे तर युथ गटात परभणी जिल्हा संघांनी विजयी ठरले.
मिनी मुले गटात अंतिम सामना ठाणे वि पुणे (ठाणे २:०) विजयी तर पुणे उपविजेता, तृतीय बीड. २०
मिनी मुली गटात अंतिम सामना बीड वि सांगली (बीड २:०) विजयी तर सांगली उपविजेता, तृतीय नाशिक.
मिनी मिश्र दुहेरीत प्रथम : पुणे, व्दितीय: नाशिक, तृतीय: परभणी.
युथ मुले गटात अंतिम सामना ठाणे वि नाशिक (ठाणे २:१) विजयी तर नाशिक उपविजेता, तृतीय : परभणी.
युथ मुली गटात अंतिम सामना बीड वि उपनगर मुंबई (ठाणे २:०) विजय तर उपनगर मुंबई उपविजेता तृतीय मुंबई शहर .
युथ मिश्र दुहेरीत प्रथम : परभणी व्दितीय: नाशिक, तृतीय: ठाणे
दि. १७ डिसेंबर, सांय ०४ वा.
बक्षीस वितरण सोहळा सैन्यदलातील निवृत्त मेजर राजकुमार बागल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष स्थानी महेंद्र धर्मा पाटील (भाजपा शहराध्यक्ष ), डॉ. दिपक मेश्राम (माजी कुलसचिव नागपूर विद्यापीठ), डॉ. धनंजय बेडदे ( अध्यक्ष एमडीएस संस्था पनवेल)गणेश माळवे (राज्य सचिव) डॉ. दिनेश शिंगारम (राज्य कोषाध्यक्ष) संजय ठाकरे (राज्य सदस्य) रामेश्वर कोरडे, अशोक शिंदे (विभागीय सचिव) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. मुकुल आव्हाड तर आभारप्रदर्शन अनिल घुगे यांनी केले.
रेफरी बोर्ड सचिव सतीश नावाडे,पंचप्रमुख गणेश पाटील, बंडू जामदडे, राहुल पेंटकर, संतोष शिंदे, निलेश माळवे, स्वप्निल चव्हाण, गणेश कडुलिग , अभिषेक सोनवणे, प्रज्वंल पिंपळकर, बोडके,
addComments
टिप्पणी पोस्ट करा