महाराष्ट्र स्टेट हाऊसिंगच्या संचालकपदी हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड

सहाव्यांदा झाली निवड

नांदेड/प्रतिनिधी

अतिशय महत्वाच्या समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर यांची बिनविरोध संचालकपदाच्या निवडणुकीत निवड झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष भोसीकर या हाऊसिंग फायनान्सवर सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत.

महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई संचालकपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार या निवडणुकीसाठी अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अनेक जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे संचालकपदाच्या निवडणुकीत नांदेड जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्वाचन अधिकार्‍यांनी मुंबई येथे दि. 13 डिसेंबर रोजी जाहीर केली. तसेच या निवडणुकीमध्ये औरंगाबाद येथून काँग्रेसचे सुनील जाधव, नांदेड येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिहरराव भोसीकर, परभणी येथून शिवसेना ठाकरे गटाचे रविंद्र देशमुख, बीड येथून राष्ट्रवादी अजित दादा गटाचे जयसिंग पंडीत, हिंगोली राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण यांचीही संचालकपदी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नूतन संचालक हरिहरराव भोसीकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या