नांदेड दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सायन्स कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी चे अवचित्य साधून महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पांजली वाहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरां मध्ये महाविद्यालयातील प्राचार्य डॉ डा डी यु गवई यांनी अध्यक्षिय स्थान भूषविले.
प्रमुख पाहुण्या म्हणून मुखेडच्या ग्रामीण महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या डॉ शिल्पा शेंडगे पाटील यांनी मार्गदर्शन करताना महिलांना वारसा हक्कात स्थान देणारे हिंदू कोड बिल मंजूर करावे यासाठी आग्रह धरणाऱ्या डॉ बाबासाहेबांना पाठबळ देण्याची भूमिका ह्यामागे होती. डॉ बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या आठवणी आज ताज्या झाल्या पाहिजेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी, वंचितांसाठी आपले जीवन अर्पण केले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले असे नाही त्यांनी व त्यांच्या कुटुंबाचा त्याग आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे विचार स्पष्ट केले. डॉ रेखा वाडेकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग मांडून त्यांनी जीवनात केलेल्या कार्याबद्दल माहिती कवितेच्या माध्यमातून प्रस्तुत केली. प्रा तुकाराम बोईवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य यावर आपले विचार मांडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर एक गीत प्रस्तुत करून त्यांच्या जीवनातील प्रसंगावर प्रकाश टाकले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य महोदय डॉ डा डी यु गवई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, आणि समाज सुधारक कसे होते विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन महाविद्यालयाच्या उप प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी केले.तसेच प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी प्रस्तावना मांडताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन त्या निमित्त त्यांच्या समग्र सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे चिंतन व मनन पुन्हा होण्याची गरज आहे. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या विचारांना उजाळा मिळाला पाहिजे आदान प्रदान झाले पाहिजे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ई एम खिल्लारे यांनी केले. महाविद्यालयात उपस्थित मान्यवरां मध्ये डॉ ए एस बनसोडे, डॉ बी डी गचांडे, डॉ डी आर मुंडे, डॉ प्रीता बोरकर, डॉ सौ व्ही व्ही कुलकर्णी, प्रा वर्षा बोरगावकर, डॉ ए पी बोरीकर, प्रा. अविनाश गाडगे, डॉ. संजय चव्हाण, प्रा. राजेश आचेगावे, प्रा. सुनील कदम, प्रा. कार्तिक जाधव, प्रा. श्रीकांत दुलेवाड, प्रा योगेश्वर रामासाने, आर आर राठोड, डॉ विजय किरण नरवाडे, डॉ नागेश देशमुख, प्रा एस एफ गोरे, रजिस्ट्रार गौतम वाघमारे, विजय सावने, तुकाराम गजभारे, दिलीप कापुरे, शंकर पतंगे, वैष्णवी राजुरकर, सोनाली वाणी, सुजाता साळवे, सरस्वती पाईकराव तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी कार्यक्रमात उपस्थित होते
addComments
टिप्पणी पोस्ट करा