सानपाडा रेल्वे स्टेशन भुयारी मार्गाच्या कामाचे शिवसेना उपनेते श्री.विजय नाहटा यांचे हस्ते भुमीपुजन

           गेल्या अनेक वर्ष पासुन सानपाडा रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गात अनेक ठिकाणी खड्डे पडले होते तसेच भुयारी मार्गातील रस्ताही बराच खराब झाला होता.त्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या छोट्या वाहनांना आणि मोटार सायकल स्वारांना त्रास सहन करावा लागत होता.तसेच येथील मोठ मोठ्या खड्यांमुळे अनेक वेळा ट्रॅफिकही जॅम होत होते. या भुयारी मार्गात हा रोजचा त्रास असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झाले होते. शिवसेनेचे माजी परिवहन सदस्य श्री.विसाजी लोके यांनी या भुयारी मार्गाचे नव्याने काम करावे म्हणून सिडकोकडे मागणी केली होते. ती मागणी मान्य झाली असून भुयारी मार्गाचे नव्याने काम करण्यात येत आहे.आज या कामाचे *शिवसेना उपनेते श्री.विजय नाहटा साहेब* यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेते श्री.विजय नाहटा म्हणाले की काम छोटे होते पण अतिशय महत्वाचे होते अशीच छोटी छोटी कामे पण नागरिकांच्या जिव्हाळ्याची आणि महत्वाची असतात ती तातडीने झालीच पाहीजेत जेणे करून त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही.सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याची असणारी कामे मार्गी लावावीत आणि नागरिकांना सुविधा प्रदान करावी. यावेळी श्री.विजय नाहटा साहेबांनी विसाजी लोके यांनी केलेल्या सततच्या पाठपुव्यामुळे हे काम मार्गी लागले असल्याचे सांगून विसाजी लोके यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या जिल्हा महिला संपर्क प्रमुख श्रीमती दमयंती आचरे, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, उपशहर प्रमुख गणेश पावगे,निहाल वास्कर ,आतिश घरत, विभाग प्रमुख भावेश पाटील, केदार तेंडुलकर, विकास गाढवे ,उपविभाग प्रमुख देवेंद्र चोरघे,मनोज भोईर,शाखाप्रमुख उमेश लोहोट,प्रियेश पाटील ,संजय वास्कर, अखिल सानपाडा महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने भाजपाचे सचिव संतोषजी पाचलग त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे विष्णुदास मुखेकर,विठ्ठल गव्हाणे मिलेनिअम टॉवरचे अध्यक्ष बलजीत सिंग अरोरा ,हरीश जाधव ,भारती पवार सानपाडा दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष सदानंद पाटील तसेच युवा सेनेचे समीर भोईर तसेच गटप्रमुख ओमी राणा आणि नवी मुंबई कामगार सेना प्रमुख श्री प्रदीपजी वाघमारे यांस सहित नागरीक देखील उपस्थित होते .

टिप्पण्या