माहूर (प्रतिनिधी )
सामुदायीक प्रार्थना व प्रभात काळी घेतलेल्या ध्यान कार्यक्रमाणे तसेच भजन व धार्मिक कार्यक्रमामुळे मन आनंदित, प्रफुल्लित, शांत राहते. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरा घरात नेण्याची आज काळाची गरज आहे. सामुदायीक प्रार्थनेमुळे अध्यात्मिकतेमुळे मनाची एकाग्रता, चिंतन, अज्ञान दूर करून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशकडे नेण्याचा मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेमुळे व ग्रामगीतेच्या माध्यमातून अध्यात्मिकतेचे ज्ञान घेतले पाहिजे व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून चांगल्या संस्कारांची, आचार विचारांची देवाण-घेवाण करण्याची आवश्यकता आहे.असे प्रतिपादन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी बाबारावजी केशवे यांनी केले.
वाई बाजार येथे दि.३० नोव्हे रोजी श्री गुरुदेव भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५५ व्या पुण्यतिथी दिना प्रित्यर्थ आयोजीत सामुदायीक प्रार्थनेप्रसंगी ते बोलत होते.यावेळी श्री गुरुदेव भजनी मंडळाचे कार्तिक बेहेरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन तर बाबारावजी केशवे,गिरी महाराज,मधुकर पुरी, किसन पवार,बाबाराव चिल्लेकर,विनायक टणमने,सुधाकर वाटकर,बंडप्पा गेंटलवार,दशरत जाधव हरडपकर,दिंगाबर खडसे,विष्णु उडदवाड,शाम नेवारे,यशवंत दळवे,अरुण खराटे,तबला वादक बजरंग सलाम,डोईफडे यांचेसह अनेकांनी पूष्प,माल्यार्पण करुन सामुदायीक प्रार्थनेला सुरुवात केली होती.
पुढे बोलताना केशवे यांनी, आजच्या तरुणांनी येणाऱ्या भविष्यातील पिढीचा विचार करुन ग्रामगीतेचा अभ्यास तथा सामुदायीक प्रार्थना करुन आपल्या जीवनात अवलोकन करुन समाजात चांगले विचार देण्याचे कार्य केले पाहिजे. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर महापुरुषांच्या जयंती व स्मृती स्मरण दिवस साजरे करण्यात सार्थक ठरु असे मत व्यक्त केले. यावेळी गिरी महाराज यांनी उपस्थित उपासकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या सामुदायीक ध्यान व प्रार्थनेचे महत्व सांगत आजच्या नागरिक व युवकांना आवश्यक असलेल्या विचारांवर मार्गदर्शन करुन देशातील संताची ओळख करुन दिली.या नंतर सामुदायीक प्रार्थना करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा