मी 'गुगलबाबा' हा कवितासंग्रह वाचले. हा कवितासंग्रह खूपच छान आहे. कवितासंग्रहात खूप छान छान कविता आहेत. मला या कविता वाचून खूप मजा आली. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ खूपच छान आहे. चित्रात एक रोबोट हातावर एक पदार्थ आणि ज्यूस घेऊन थांबला आहे. एक मुलगी त्याच्याकडे पाहत आहे. एक सिंहीण आपलंच पिल्लू समजून हरणाच्या पिल्लाला चाटत आहे.
वर 'गूगलबाबा' मोठ्या अक्षरात नाव आहे. मुखपृष्ठ पाहून मला समजले की या कवितासंग्रहात खूप छान छान कविता आहेत.
पहिली कविता 'घसरगुंडी' आहे. या कवितेमध्ये पावसाचे थेंब घसरगुंडी खेळतात. एक खारुताई पाऊस येत आहे, म्हणून घरट्यात लपून बसली आहे. अशा खूपच छान कविता आहेत!
'यंत्रमानव' ही कवितापण खूप छान आहे. यामध्ये रोबोट आहे. रोबोटचा मानवाने शोध लावला. जे काम सांगितले, ते काम तो करतो. त्याला हरकाम्या असेही म्हणतात. तो जणू काय गुलामच! खरंच रोबोट खूप छान आहे. रोबोटला कोणताही प्रश्न विचारा तो उत्तर सांगतो.
'नोटा आणि नाणी' ही कविता आपल्याला जुन्या काळात नेते. कारण जुन्या काळात नोटा नव्हत्या, नाणी होती. माझे वडील मला सांगतात, एकच पैसा दिला तर आम्हाला चार गोळ्या मिळायच्या. चार पैशात साखर, चाय पत्ती यायची. आता तर लोकांजवळ खूप पैसा झाला, पण खूप महागाई झाली. आमच्या वेळेस काही जरी दुकानात मागितलं, पैसे नसले तरी ते द्यायचे. आता कोणी देत नाही. पहिले माणसं खूपच चांगले होते. आताचे माणसं पैशासाठी खूप लालची झाले आहेत, असं माझे मला वडील सांगतात.
'गुगलबाबा' ही कविता खूपच छान आहे. आपल्याला कोणताही प्रश्न पडला तरी, उत्तर द्यायला गूगल तयारच आहे. गूगल म्हणजे जगाचा शिक्षक, कारण मुलांना कोणताही प्रश्न पडला, तर शिक्षक त्या प्रश्नाचे उत्तर देतात. आणि जगाला कोणताही प्रश्न पडला तर जगाचा शिक्षक म्हणजे 'गूगल' कोणताही प्रश्न पडला, तरी तो उत्तर देतो.
'सूर्याची शाळा' या कवितेत सर्व ग्रहांची माहिती दिली आहे. आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. सगळे ग्रह खूप छान शिस्त पाळतात. एकदम शिस्तीत सूर्याभोवती फिरतात. त्या ग्रहांमधलीच आपली पृथ्वी सजीवांचे पोषण करते. पृथ्वीवर किती सारे सजीव जगतात, असं या कवितेत वर्णन केलेलं आहे.
'आपणही झाडे होऊ' ही कविता खूप छान आहे. झाड ऊन, वारा, गारा झेलतं. आपल्याला उन्हाळ्यात किती छान सावली देतं! झाडांमुळे सारे सजीव जगतात. कारण झाड आपल्याला प्राणवायू देतं. फुलं देतं. फळ देतं. किती तरी औषधी झाडांपासून तयार होतात. झाडांवर किती सारे पक्षी येतात. झाडांवर पक्ष्यांची घरटी असतात. आपल्या घराजवळ झाडे असतील, तर आपलं घर किती छान दिसतं! आणि हीच माणसे घर बांधण्यासाठी झाडे तोडतात. आता झाडे खूप कमी झाली आहेत. माणसं खूप झाडे तोडायलेत. झाडे हेच आपल्या जीवनासाठी एक सोनं आहे आणि माणसे सोनंच तोडायलेत.
या कवितासंग्रहात खूप काही शिकण्यासारखं आहे. हा कवितासंग्रह खूपच छान आहे. मला खूप आवडला. आमच्या गव्हाणे सरने मला हा कवितासंग्रह दिला. सर खूप चांगले आहेत. आम्हाला सर कोणतंही पुस्तक देतात. आम्ही ते पुस्तक वाचतो आणि त्याच्यावर परीक्षण लिहितो.
- पुस्तकाचे नाव- गूगलबाबा
- कवी : डॉ. सुरेश सावंत
- मुखपृष्ठ : ज्ञानेश बेलेकर
- प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे.
- किंमत- रु. १३०
- पृष्ठे ६४.
- कु. तनुष्का राजेभाऊ काकडे
- वर्ग आठवा
- जि. प. प्रा. शाळा रायपूर ता. सेलू
- जि. परभणी.
addComments
टिप्पणी पोस्ट करा