शालेय राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेचे शानदार उद्घाटन . 48 संघाचा सहभाग

 


 सोलापूर : 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर सेपक टकरा संघटना व मागास सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय जवान जय किसान शाळेच्या मैदानावर दि. 4 डिसेंबर रोजी स्पर्धेचे सोलापूर जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ‌ यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, मागास सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण, सचिव किरण चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संजय सावंत, जिल्हा सचिव रामचंद्र दत्तू, नगरसेविका अश्विनी चव्हाण, राज्य क्रीडा मार्गदशक गणेश पवार, तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, तालुका क्रीडा अधिकारी नदीम शेख, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, रवि चव्हाण, राज्य सहसचिव चंद्रकांत भोईटे, राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, मिर्झा इक्बाल, मनोज बनकर, रवि बकवाड, असिफ इकबाल, उपस्थित होते‌.

 याप्रसंगी जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धेतून भावी जीवनात यशस्वी होतो. खेळाडूंनी नियमितपणे मैदानावर खेळ खेळायला पाहिजे. 

 आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले  

      राज्य भरातून आठ विभागातील 48 संघातील 240 खेळाडू, पंच, प्रशिक्षक, यांनी सहभाग नोंदविला आहे. सर्व खेळाडूंना भोजन व निवासाची व्यवस्था जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या