मुंबई दि.३०: शंभर वर्षीची परंपरा जपणा-या सहकारी मनोरंजन मंडळला नुतनीकरणात स्थान मिळालेच पाहिजे आणि दामोदर नाट्यगृह पुन्हा त्याच ठिकाणी उभे राहिले पाहिजे,नाहीतर सर्व कलाकार या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतील,असा खणखणीत इशारा भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ अभिनेते विजय पाटेकर यांनी येथे आंदो लनात बोलताना दिला आहे.
सध्या दामोदर नाट्यगृह बंद करण्यात येऊन,संपुर्ण गिरणगावाची सांस्कृतिक चळवळ म्हणून ओळख निर्माण करणा-या दामोदर नाट्यगृहाचे भविष्य अंधारात आले आहे,तर नाट्यरंगभूमीला उर्जितावस्था निर्माण करणा-या सहकारी मनोरंजन मंडळाला अद्याप नुतनीकरणात अधिकृत स्थान मिळालेले नाही,त्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला आहे.या एकूण पार्श्वभूमीवर आज परेलच्या दामोदर नाट्य गृहासमोर सहकारी मंजोनद्वारे "मनोरंजन संस्था आणि दामोदर नाट्यगृह बचाव" चे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनात ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते,दिग्दर्शक हेमंत भालेकर,अभिनेते मोहन साटम,विजय पवार,शाहीर मधु खामकर,महादेव खैरमोडे आदींची भाषणे झाली.मराठी रंगभूमीला अंधारात ठेवून नुतनीकरण करणा-या सोशल सर्व्हिस लीगच्या कारवाया लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत न्यायचे, तसेच संबधित आमदार,नगरसेवक आदी पर्यंत हा प्रश्न नेण्याचेही आज ठरले आहे.
भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते ना.म.जोशी यांनी १९११ मध्ये समाजसेवची स्थापना केली आणि त्यांनी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक विभाग सूरु केले.आज सीबीएसई द्वारे सोशल सर्व्हिस लीग शाळा चालविणाऱ्या संस्थेद्वारे विविध समाज संस्थाचा कारोभार हाकला जात होता.परतु या भव्य वास्तूचे नुतनीकरण करताना,१०१ वर्षे येथे नाट्य चळवळीचे कार्य करणाऱ्या "सहकारी मनोरंजन मंडळा"ला केवळ मौखिक आश्वासनावर झुलवण्यात येत आहे. नुतनीकरणात बाबत त्यांची बोलवण करण्यात येत आहे.त्यांना कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन आद्यप देण्यात आलेले नाही, त्या मुळे हा वाद चव्हाट्यावर आला आहे.या प्रसंगी सहकारी मनोरंजनचे अध्यक्ष प्रमोद तांबे, सेक्रेटरी ज्येष्ठ रंगकर्मी के.राघवकुमार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य रविराज नर यांनी केले.रुपेश कदम,दक्षता गोसावी,विनिता ठाकूर,राहूल पवार आदीं कार्यकारीणी सदस्यांचे आदी कार्यकर्त्यांचे परिश्रम विशेष महत्त्वाचे ठरले.मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी मंडळाच्या वरील मागणीला आपला पाठिंबा दिला आहे.•••
addComments
टिप्पणी पोस्ट करा