मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आदर्श कामगार कार्यकर्ते विजय चोरगे सेवानिवृत्त*


मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील शेड सुप्रिटेंडेन्ट व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कमिटी मेंबर श्री. विजय चोरगे हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्या निमित्ताने साई कृपा सेवा फंड व सेवाभाव १९८७ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भाऊचा धक्का येथे विजय चोरगे यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. 

या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे चिटणीस व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे असिस्टंट ट्राफिक मॅनेजर गणेश जाधव, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष बबन शिरोडकर, विशाल जुन्नर पतपेढीचे संचालक अरुण पारखे, बबन हडवळे, चोरगे यांची सुकन्या श्रुतिका इत्यादी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्काराला उत्तर सत्कारमूर्ती विजय चोरगे यांनी दिले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने व इतर संस्थांच्या वतीने विजय चोरगे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते सर्वश्री रमेश गुरव, अशोक खताळ, राजेंद्र खोपडे, विजय गुरव, हरिभाऊ फलके,रमेश पवार,प्रशांत थोरात, सरोदे, इत्यादींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहितीपट दिग्दर्शक व निर्माते विजय सोमा सावंत यांनी केले.

आपला 

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या