कामगार वर्गाने संघर्ष आणि लढ्यातून मिळविलेल्या ४४ कामगार कायद्याचे चार संहितेत रुपांतर करून कामगारांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेणा-या कामगार विरोधी सरकारला येत्या २०२४ च्या निवडणुकीत सत्तेवरून हटविण्याची,मागणी आज आझाद मैदानावरील निर्धार मेळाव्यात कामगार नेत्यांनी एकमुखाने केली आहे.कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती,महाराष्ट्राच्या वतीने आज आझाद मैदानावर हे निर्धार आंदोलन छेडण्यात आले.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर म्हणाल्या,आज सरकार फक्त मुठभर उद्योगपतींचे भले पहाते आहे.पण खाजगीकरणातून
बेरोजगार झालेल्या कामगारांना मात्र शोषणाच्या खाईत लोटत आहे.परदेशात गिरण्या चालू शकतात.पण केंद्र सरकार येथील गिरण्या चालविण्या बाबत खोटी कारणे देत आहे,हा मोदी सरकारचा बनाव आहे,असे सांगून मेघा पाटकर पुढे म्हणाल्या,सफाई कामगार ठेकेदारी पध्दतीवर चालवू इच्छिणारे हे सरकार असंवेदनशील आहे.
सभेत संयुक्त कृती समितीच्या अध्यक्षीय समितीचे नेते, महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, डॉ.विवेक मोंटेरिया, संजय वढावकर, निवृत्ती धुमाळ, रेल्वे कामगार नेते प्रदीप शिंदे, जे. आर. भोसले, बजरंग चव्हाण,उदय भट, उदय चौधरी, इंटकचे मुकेश तिगोटे,कॉ.बबलू रावत,कॉ.शुभा शमिम दादाराव पटेकर,कॉ.चटोपाध्याय,अविनाश दौंड आदीं कामगार नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
आजच्या आंदोलनाला इंटक, आयटक, एच.एम.एस,सिटू, एआयसीसीटीयु.एनटीयुआय,बीकेएसएम,राज्यसरकारी कर्मचारी संघटना, केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला होता.आज नागपूर,पुणे,नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर येथे मोर्चे काढून आंदोलन छेडण्यात आले. आणि केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. इंटकचे दिवाकर दळवी,अनिल गणाचार्य आणि अन्य कामगार संघटनांचे मान्यवर नेते उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा