हिंदी भाषा विविधतेत एकतेचे सूत्र निर्माण करते- प्राचार्य डॉ. घुंगरवार

 



नांदेड: वैश्विक स्तरावर हिंदी भाषेचे महत्त्व खूपच मोठ्या प्रमाणात आहे. हिंदी भाषा ही विविधतेत एकतेचे सूत्र निर्माण करते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले.  

नवीन नांदेड परिसरातील वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हिंदी पंधरवाड्याचे औचित्य साधून नुकताच विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार बोलत होते. 

प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार पुढे म्हणाले, हिंदी या भाषेचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय, हिंदी भाषा अनेक शब्दांना आत्मसात करून समृद्ध बनली असल्याने हिंदी भाषा ही विविधतेमध्ये एकतेचे सूत्र निर्माण करण्याचे कार्य करते, असेही प्राचार्य डॉ. घुंगरवार यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रारंभी, प्रमुख वक्ते प्रा. बी. बी. ब्रदवाल यांनी, हिंदी भाषा ही जगातील चौथी प्रसिद्ध भाषा असल्याचे सांगितले. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. ब्रदवाल यांनी हिंदी भाषेचे महत्त्व नमूद करुन प्रेमचंद यांच्या साहित्यातून भारताच्या समग्र ग्रामीण जीवनाचे दर्शन होत असल्याचे याप्रसंगी आवर्जून सांगितले. ‌  

याप्रसंगी उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. व्ही. आर. राठोड, प्रा. एन. पी. दिंडे, प्रा. डॉ. एन. व्ही. कांबळे चोंडीकर, डॉ. व्यंकटेश देशमुख तसेच वसंतराव नाईक कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी व सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. बुशरा शेख यांनी केले, तर प्रा. कपिल हिंगोले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या विशेष कार्यक्रमाचा समारोप झाला.

टिप्पण्या