*महात्मा गांधीजींच्या अहिंसक विचारानेच देश पुढे जाईल!* *रा.मि.म.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची श्रध्दांजली!*

 


    मुंबई दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अंहिसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.तोच विचार श्रेष्ठ असल्याने त्याच्या अनुकरणाने देश पुढे जाईल,अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यागमयी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली आहे.अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनीही सत्य-अंहिसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन केले आहे. 

    राष्ट्रीय मिल मजदूर संघा वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंती निमित्तानं कार्यालयात स्वच्छता अभियान राबवून, पुज्य राष्ट्रपुरुषाला अभिवादन करण्यात आले.

     संघटनेने सदैव गांधी विचारांची जोपासना केली आहे,असे सांगून सरचिटणीस गोविंदराव मोहिते पुढे म्हणाले,महात्मा गांधी यांनी आपल्या जीवन कार्यातून सत्य आणि अंहिसेचा आदर्श निर्माण केला.परंतु आज मणिपूरपणे जो हिंसाचार चालू आहे,तो गांधी तत्वप्रणाली विरूद्ध आहे.म्हणूनच महात्मा गांधींचा विचार कृतीने अंमलात आणणे काळाची गरज आहे, असेही गोविंदराव मोहिते म्हणाले.सर्वश्री खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर यांनीही आदरांजली वाहिली‌.या प्रसंगी भूतपूर्व पंतप्रधान स्व.लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या त्यागमयी देश कार्याला उजाळा देण्यात आला.••••

टिप्पण्या