राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर न्यायालयात वकिली करणारे वकील सी. डी. वाठोरे यांना दि.२१ सप्टें.रोजी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांनी अपशब्द उच्चारून अवमान केल्याच्या निषेधार्थ वकिलांनी सोमवार दि.25 सप्टें.2023 रोजी न्यायालयाच्या कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पक्षकारांना पुढची तारीख घेऊन रित्या हाताने घरी परतावे लागले आहे.
तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अपमानास्पद व हीन दर्जाची वागणूक दिल्यासंदर्भात विधिज्ञ वाठोरे यांनी दि.22 सप्टें.रोजी माहूर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे वकील वर्गात कमालीचा असंतोष उफाळून आल्याचे दिसून येते. वकिलांनी सोमवारी कामकाजावर बहिष्कार टाकल्याने सुमारे 40 दावे बाधित झाले आहेत.*महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाईल* अशी माहिती पो. नि. डॉ. नितीन काशीकर यांनी दिली.*माहूर तहसीलदारांनी एकट्या विधिज्ञ सी. डी.वाठोरे यांचाच नव्हे तर सर्व वकिलांचा अपमान केला आहे.त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून नांदेड जिल्हा सत्र न्यायालयासह लोहा,कंधार, किनवट आदी ठिकाणच्या वकिलांनी कामावर बहिष्कार टाकून पाठींबा दर्शवीला* असल्याचे अभिवक्ता संघाचे सचिव दिलीप मेहता यांनी सांगितले. *कुठलीही सुनावणी गोपनीय नसते, सुनावणीच्या वेळी वकिलांस बाहेर काढणे कायद्याची पायमल्ली होय. संबंधित तहसीलदारावर कारवाई होणे नितांत गरजेचे आहे, तसे न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडू* असा इशारा माजी अध्यक्ष विधिज्ञ चेतन राठोड यांनी दिला आहे.*तहसील कार्यालयात वकिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था नाही,दैनंदिन सुनावणीच्या कामाचा फलक लावलाजात नाही,मागच्या दोन वर्षात सुमारे तिनशे प्रकरण प्रलंबीत पडले असून अनेक सुनावणींना तहसीलदार उपस्थित राहिले नसल्याने कामकाज झाले नाही,तर काहींची सुनावणीच झाली नाही.तसेच मागच्या दोन वर्षात एकही निकाल आला नाही* अशी खंत अभिवक्ता संघाचे सदस्य विधिज्ञ पी. पी. ठेपेकर यांनी व्यक्त केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा