उदगीर,
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात प्रसिद्ध नेत्र रोगतज्ञ डॉ दयानंद निजवंते यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दयानंद निजवंते, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, संतोष चामले , विभाग प्रमुख प्रा युवराज दहिफळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उदगीर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ दयानंद निजवंते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमित दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत. सारखे डोळे चोळू नये. आपल्याला डोळे दान करायचे असेल तर लाॅयन्स क्लब उदगीर येथील दवाखान्यात नोंद करावी.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. दयानंद निजवंते यांनी सांगितलेले विचार आत्मसात करुन आपल्या जीवनात आचरण करावे. आपले डोळे चांगले राहिलेत तरच आपण या जगाचे सौंदर्य पाहू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार गणित विभाग प्रमुख संतोष चामले यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, बालाजी मुस्कावाड, सुधीर गायकवाड, शिवकुमार कोळ्ळे, नागेश पंगू,सतीश जगताप विलास शिंदे, श्रीकांत देवणीकर, प्रा. नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा