माहूर (प्रतिनिधी ) महानुभाव पंथियांचे चौथे कृष्ण भगवान श्री गोविंदप्रभू (श्रीप्रभू बाबा ) यांची जयंती स्थानिक मंगलाश्रम येथे बुधवार दि.27 सप्टें. रोजी रात्री 10 वा. भक्ती भावात साजरी करण्यात आली.यावेळी गोविंदप्रभू यांच्या अवतार कार्यावर प. पू. प्रदीपराज कपाटे ( पंजाबी )श्री दत्तगड बेलोना जि. यवतमाळ यांचे प्रवचन झाले.
प.पू. प्रदीपराज कपाटे यांनी आपल्या प्रवचनातून श्री गोविंदप्रभू बाबा यांनी छोट्या छोट्या कृतीतून कसा अंधश्रद्धेवर प्रहार केला, कसे समाजहित साधले त्याची आपल्या रसाळवाणीतून योग्य ती मांडणी केली.तसेच त्याकाळीची समाज व्यवस्था व विद्यमान स्थिती यातील फरक विशद करून आधुनिकता व परंपरा यातील चांगल्या गोष्टींचा अंगीकार करण्याचा बाबांनी सल्ला दिला.
संत व सदभक्तांच्या उपस्थित रात्री 10 वा.जन्म विधीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम प.पू. प्रदीपराज बाबा यांचे हस्ते विशेषाला (श्री गोविंदप्रभु बाबां यांचा चरणांकिंत पाषाण)मंगल स्नान घालण्यात आले.तदनंतर विडाअवसर करण्यात येऊन आरती करण्यात आली.त्यानंतर रात्रीला विष्णू पेंदोर, दिलीप पाटील,अशोक हूमने,राजू आराध्ये यांच्या भजन मंडळाने भजन गाऊन ईश्वर चिंतन केले.दूसरे दिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दिनेश कपाटे,विकास कपाटे, सतीश आराध्ये, राजेश आराध्ये,देवेंद्र कपाटे,आदर्श विद्वान्स,अजिंक्य तळेगांवकर,प्रवीण विद्वान्स,सुरेश आराध्ये,राहुल आराध्ये,सचिन कपाटे,विजय आराध्ये,अजय विद्वान्स,दत्तात्रेय धुळधर,मंगेश कपाटे,वैभव हुमणे,जगदीश आराध्ये,अमोल आराध्ये,पवन पांढरे,विनोद वानखेडे,रोहित वाघमारे यांचेसह सर्वज्ञ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा