शेतकरी कंपन्या ह्या अनुदानासाठी नसून उद्योग उभारण्यासाठी - सूर्याजी शिंदे*

 


नांदेड : शेती हा वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय म्हणून कर न करता कृषी उद्योग म्हणून करावा. शेतकरी मित्र फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योगाची उभारणी ही मालेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणारी असेल असा विश्वास दत्तगुरु फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष सूर्याजी शिंदे यांनी शेतकरी मित्रच्या वेअर हाऊस भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला.

   कै.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास परिवर्तन स्मार्ट योजनेअंतर्गत गोदाम बांधकाम व स्वच्छता प्रतवारी युनिटचे भूमिपूजन सूर्याजी शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्मार्ट चे विभागीय (लातूर )नोडल अधिकारी भास्कर कोळेकर हे होते. स्मार्ट चे अमलबजावणी कक्ष प्रमुख अनिल गवळी, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, उमेश मुंढे, कृषी अधिकारी अनिल शिरफुले. शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून केलेले काम व भविष्यात कंपनीचे प्रस्तावित प्रकल्प याविषयी कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली. स्मार्ट चे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. कृषिरत्न आर.पी. कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम, डॉ लक्ष्मण इंगोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील काकांडीकर, बालाजी मरकुंदे, सतीश कुलकर्णी,बळवंत इंगोले,सतीश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच अनिल इंगोले, केशवराव इंगोले, टोकाईचे संचालक शिवाजीराव सवंडकर, कार्यकारी संचालक मालेगावकर, उपसभापती सुनील अटकोरे टोपाजी पाटील, लिंबाजी पाटील भोरे,ज्ञानोबा कदम, टोपाजी पाटील, डॉ.साहेबराव इंगोले, संजय मुलंगे,शरद जोशी,बंडू कदम,मा.उपसभापती सुनील अटकोरे,जळबाजी बुट्टे ,विश्वनाथ कदम परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक तनय एकनाथराव पाटील, निवृत्ती कदम,तुकाराम आवर्दे, अमोल जोगदंड, प्रभाकर इंगोले,शिवकांता जाधव,अनुराधा इंगोले, अविनाश इंगोले, माधव कदम, इंजी. राहुल चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रम घेतले.

 आभार कृषी भूषण भगवान इंगोले यांनी व्यक्त 

टिप्पण्या