परभणी (. )
परभणी कौशल्य उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम स्किल रन या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
सकाळच्या सत्रामध्ये 17 सप्टेंबर 2023 रोजी पी.एम. स्किल रन स्पर्धेचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानातून करण्यात आले . या स्पर्धेचे रीतसर उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे ,सुनील पोटेकर , आयएमसी मेंबर योगेश पेडगावकर , डॉ.विशाल गरड, डॉ. सुरेश शिवणीकर , प्राचार्य विकास आडे , स्पर्धा समन्वयक श्री भातलवंडे सतिश , काळे सर वाणी सर कार्यालयीन अधीक्षक श्री देशमुख रामकिशन , टिपरसे सुर्यकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले या मॅरेथॉन स्पर्धेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . ही मॅरेथॉन स्पर्धा आयटीआय पासून विसावा कॉर्नर पर्यंत घेण्यात आली होती . या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेऊन स्किल बाबत प्रचार प्रसार व्हावा व आयटीआय ही जनताभिमुख व्हावी याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये प्रथम तीन हजार रुपये द्वितीय 2000 रुपये तृतीय 1000 रुपये याप्रमाणे रोख पारितोषिक देण्यात आली प्रथम पारितोषिक करण रामा बल्लाळ टर्नर ट्रेड , द्वितीय पारितोषिक अभिषेक दत्तराव शेळके मोटर मेकॅनिक ट्रेड, तृतीय पारितोषिक गोविंद दत्ता गायकवाड वायरमेन ट्रेड , मुलींच्या गटामध्ये प्रियंका सुनील वाघमारे प्रथम पारितोषिक , द्वितीय पारितोषिक सुप्रिया संजय खिल्लारे ,तृतीय पारितोषिक गायत्री संतोष लटपटे या खेळाडूंनी प्राप्त केले आहे. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे .स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीएम स्केल रन स्पर्धेचे समन्वयक भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ऍथलेटिक प्राविण्य प्राप्त खेळाडू तथा शिल्प निदेशक प्रकाश बनाटे , कदम बिडी , खंडेराय , नालंदे संतोष, संबरकर पवन साखळकर , गवई यु.आर., जोगदंड , संपर्क सावळगे सुधीर, कोकणी बी एस , गिरीश केदार प्रकाश मांजरमकर , काचगुंडे सुभाष , वाघमारे संदिपान स्पर्धा यशस्वी होण्यासाठी यांनी परिश्रम घेतले
addComments
टिप्पणी पोस्ट करा