लालबागचा राजा आणि गिरणी कामगारांचे ऋणानुबंध:सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती*





   मुंबई दि.२९: काल रात्री पावणे बारा वाजता भायखळा येथील गिरणी कामगारांनी लालबागच्या राजाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली दर्शन घेऊन गिरणी कामगार आणि लालबाग राजाचे वर्षोनुवर्षाचे ऋणानुबंध दाखवून दिले.राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने तेथे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.अध्यक्ष सचिन अहिर आणि गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेली अनेक वर्षे गिरणगावात असा स्वगत कक्ष उभारून तेथून जाणा-या गणेश भक्तांना अल्पोपहार आणि थंड पेयाने तृप्त करून माणुसकीचे नाते जपण्यात येते.संपातून असेल नाहीतर जागतिकीकरणाच्या लाटेत असेल, जेव्हा जेव्हा गिरणी कामगारांवर संकटे आली,तेव्हा तेव्हा लालबाग राजाच्या दर्शनाने आपल्याला जगण्याचा आत्मविश्वास गवसला आहे,अशी भावना खटाव मिलचे कामगार आणि अन्य गिरणी कामगारांची राहिली आहे.या स्वागतात खटाव मिल आणि एनटीसी मिल कामगारांचा आवर्जून पुढाकार राहिला आहे.संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष अण्णा शशिर्सेकर, सुनिल अहिर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच सर्व संघटन सेक्रेटरी आदींचे या कामी महत्त्वाचे योगदान राहिले आहे.भायखळा येथे काल रात्रौ पावणे बारा वाजेपर्यंत प्रतिक्षा करत गिरणी कामगारांनी आपल्या लाडक्या गणरायावर पुष्पवृष्टी केली आणि आपले ऋणानुबंध जतन केले.••••

टिप्पण्या