नावाजलेल्या जेष्ठ लावणी सम्राज्ञी शांताबाई काळे यांना हक्काचे घर मिळावे जनता दलाची सरकारकडे मागणी

 

प्रतिनिधी प्तिनिधी : 'कोल्हाट्ट्याच पोरं' या नावाजलेल्या पुस्तकाचे लेखक स्वर्गीय डॉ किशोर काळे यांच्या मातोश्री नावाजलेल्या जेष्ठ लावणी सम्राज्ञी शांताबाई काळे मु.पो.नेर्ले ता.करमाळा जि. सोलापूर या ठिकाणच्या रहिवाशी असून त्यांनी लावणी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून त्याकाळी लावणीला घराघरात पोहचले आहे.त्यांचा मुलगा स्व.डॉ किशोर काळे यांचा सन २००७ साली रस्ते अपघात होऊन निधन झाले होते.शांताबाई काळे यांचा तो एकमेव आधार होता,त्या सध्या वृद्धापकाळाने काहीही करू शकत नाहीत. त्यांना स्वतःचे असे घर देखील नाही.त्यांची उपजीविका म्हणून कोणतेच साधन नाही.त्यावेळी त्यांनी लावणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम केले आहे.त्यांचे हे काम पाहता व त्यांच्या मुलाने स्व.डॉ किशोर काळे यांनी स्वतः लिहिलेल्या "कोल्हाट्ट्याच पोरं' या नावाजलेल्या पुस्तकाचा व सध्याची जेष्ठ असलेल्या लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांना शासनाने त्यांच्या जिल्ह्यात कोठेही घर बांधून द्यावे व शासनाची कलाकारांना देण्यात येणारी पेंशन सुद्धा द्यावी अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज