राम दातीर
माहूर(प्रतिनिधी )माहूर पोलीस स्टेशनचे पो. नि. नितीन काशीकर यांच्या नेतृत्वातील पथकाने दि.24 सप्टेंबर रोजी लिंबायत, पाचुंदा व कुपटी या तीन गावात हातभट्टी दारू विक्रीवर धाड टाकली. त्यात सुमारे दहा हजार रुपयाची दारू जप्त करून संतोष किसन ताटू व गजानन केशर जयस्वाल या दोघांना जेरबंद केले. या धाडसी कारवाईने अवैध धंद्यात लिप्त असलेल्या मंडळीचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, अबिनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. नितीन काशीकर यांच्या नेतृत्वात सपोनि संजय पवार, वाठोरे,पालसिंग ब्राह्मण, आनंद राठोड, संग्राम पवार,पोहेका चौधरी,बाबू जाधव व चालक पांडुरंग गुरनुले यांनी सदरच्या कारवाईत भाग घेतला.
*माहूर शहरासह तालुक्यात सर्वच प्रकारच्या अवैध धंदे करण्यावर बंदी असून तसे केल्याचे आढळून आल्यास तसेच समाज माध्यमात आक्षेपार्ह टिप्पणी व चित्र टाकून शांतता भंग केल्यास आणि चिडीमार केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही* अशी तंबी पो. नि.
डॉ.नितीन काशीकर यांनी दिली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा