नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ९ मधील मिलेनियम टॉवर बी टाइप सोसायटीचा पाच दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने वाजत गाजत साजरा झाला. यावर्षी मंडळांतर्फे साडेअकरा फूट उंचीची सिंहासनावर बसलेली आकर्षक, सुंदर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. उत्सव काळात लहान मुलांच्या स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सोसायटीतील रहिवाशांना व गणेश भक्तांना दररोज संध्याकाळी आरती नंतर महाप्रसादाचे सुंदर आयोजन केले होते. गणेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष बलजीत सिंग अरोरा, सचिव बाळासाहेब हांडे, खजिनदार सतीश गायकवाड, सचिन तावडे, निवृत्ती ढोबळे, विजय सिदृक, प्रदीप कांबळे, प्रमोद सावंत, प्रभाकर बेहरे, सहदेव आंचलकर, प्रकाश बिरादार, शिवाजी पाटणे, नागनाथ सोनवणे, सिद्धार्थ रायगावकर, सीमा पाल, रेवाळे, मारुती विश्वासराव व सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन स्वाती सावंत व अनिता मिस्त्री यांनी केले. त्यांना किरण अरोरा, पल्लवी अरोरा यांनी चांगले सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमात कोळीगीत विशेष गाजले. या कोळी नृत्यामध्ये स्वाती सावंत, अनिता मिस्त्री, नूतन विश्वासराव, शोभा पाटणे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. गणपती विसर्जनाची मिरवणूक पुणे येथील ढोले ताशानी भव्य स्वरूपात वाजत गाजत झाली. गेली १९ वर्ष मिलेनियम बी टॉवर सोसायटीमध्ये असा गणेशोत्सव कधी साजरा झाला नाही, अशी सर्व रहिवाशांमध्ये चर्चा आहे
मिलेनियम टॉवर बी टाईप सोसायटी गणेशोत्सव मंडळास खासदार व नवी मुंबईचे माजी महापौर संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नगरसेवक सोमनाथ वासकर, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, विभाग प्रमुख अजय पवार, शाखाप्रमुख व सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव बाबाजी इंदोरे,भाजपाचे आबा जगताप, सुनील कुरकुटे, पांडुरंग आमले आदी मान्यवरांनी भेट दिली.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा