अंधाधुंद कारभार चालवणाऱ्या सरकारला मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - माजी आ.बेटमोगरेकर


कृउबा समीती निवडणुकीच्या प्रचारार्थ बेटमोगरा येथे जाहीर सभा संपन्न 


मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी 

केंद्रात, राज्यात व मुखेड तालुक्याच्या सत्तेवर बसलेली सरकार गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांची सरकार नाही. ही सरकार सत्तेवर बसून हुकुमशाही गाजवणारी सरकार आहे,अशा हुकुमशाही व अंधाधुंद कारभार चालवणाऱ्या सरकारला थांबविण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला साथ द्यावी लागणार आहे, असे प्रतिपादन मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड कृ.उ.बा.समीती निवडणुकीच्या प्रचारार्थ बेटमोगरा येथे आयोजित जाहीर सभेत केले.

                            यावेळी मंचावर उपस्थित माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी आमदार अविनाश घाटे,माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, शिवसेना नेते तथा माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव,शिवसेना तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजीव पा.रावनगावकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,शौखत खान पठाण,अशोक पा.रावीकर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, सुभाष पा.दापकेकर, डॉ.रणजित काळे सह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष म्हणजे या प्रचारसभे दरम्यान पावसाने जोर धरला होता मात्र हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या नागरिकांनी उत्साहाने नेत्यांसोबत भर पावसातच भिजत प्रचार सभेला यशस्वी केल्याने मतदारांत महाविकास आघाडीवर असलेले स्नेह, विश्वास या प्रचारसभेत सिद्ध झाले आहे.

यावेळी,माधवराव पा.उंद्रीकर,नामदेव पा.जाहूरकर, हणमंत नारनाळीकर,दिलीप सावकार कोडगीरे,उत्तमअण्णा चौधरी, नंदकुमार मडगुलवार,गणपत गायकवाड,उज्वलाताई पत्रे,संदिप घाटे तुपदाळकर,धनराज पा.बेटमोगरेकर,नय्युम दफेदार, भानुदास पाटील,बाबुराव दस्तुरे हंगरगेकर,संदिप पा.बेटमोगरेकर, सुरेश पा.बेळीकर,मैनोद्दीन पिंजारी, संजय नुकुलवाड सह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या