अभ्यासा बरोबर खेळने ही गरजेचे:-तहसीलदार दिनेश झांपले*



*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा शालेय योगासन , तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*. 

(सेलू ) 

              सध्याच्या स्पर्धेच्या काळात अधिकाधिक मुले व पालकही अभ्यासावरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत परंतु शरीर आणि मन सुदृढ असेल तरच अभ्यासात प्रगती करता येते, म्हणून म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी अभ्यासा बरोबरच मैदानावर खेळनेही ही आवश्यक आहे असे प्रतिपादन तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले. 

         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय परभणी, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ता. ११ सप्टेंबर रोजी नूतन विद्यालय सेलू येथे आयोजित जिल्हा स्तरीय शालेय योगासन व तलवारबाजी क्रीडा स्पर्धा मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन करण्यात आले.

     प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन वि.शि.संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते , उद्घाटक म्हणून तहसीलदार दिनेश झांपले होते. प्रमुख पाहुणे नूतन शिक्षण संस्था सदस्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, योगासन जिल्हा सचिव डी.डी.सोन्नेकर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे,

         या स्पर्धेत जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकुण १२५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 

      . कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे , सुत्रसंचालन प्रशांत नाईक,तर संजय भुमकर यांनी आभार मानले. 

       स्पर्धेचा अंतिम निकाल: 

१४ वर्षे मुले

कृष्णा मैड,शंकर देवकर

शुभम निर्वळ,सोहम शिंदे

जाधव सोमनाथ


१४ वर्षे मुली: 

सृष्टी सोळंके,भावणी माड

श्रुती कुंभार,अंजली गायकवाड

ऋतुजा शेळके,

१७ वर्षे आतील मुले:

देशमुख शिवम,

मगर सोहम,आदर्श बागल

कदम ओमकार, बागल संतोष

१७ वर्षं आतील मुली

अपूर्वा घुमरे,सानवी धिके

अक्षरा म्हस्के,प्रिती म्हेत्रे, प्रतिक्षा कारके

 19 वर्षातील मुले: 

गरुड सुमित ,काकडे अगस्ती,

कानडे राजाभाऊ 

रास्ते श्रीकांत गजानन

सोमाणी धनवर्धन राहुल

१९ वर्षे आतील मुली: 


संस्कृती डहाळे,श्रृती खंदारे, श्रेया घिके,नंदिनी चौर,दुर्गा मोहोर, 

पंच म्हणून,संजय भुमकर, जुलाह खुदूस राजेश राठोड, शिल्पा पिपंळे, माधव देशपांडे, सोमनाथ महाजन, कृष्णा लोहिया, सुष्मिता सोमाणी, यांनी काम पाहिले.

टिप्पण्या