माहूर ( प्रतिनिधी )शहरातील कपिलनगरमधील रवींद्र बेहरे यांचे घरी किरायाने वास्तव्यास असलेले भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ऍड.दिनेश येउतकर हे बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोने, चांदी व रोख रक्कम असा एकुण ५९ हजारांचा ऐवज लंपास केला.
ऍड.येउतकर हे २३ सप्टें.रोजी बाहेर गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कानातले, कमरपट्टा, पैंजण, कडे, बाजूबंद, रोख रक्कम १५ हजार असा ४९ हजार शंभर रुपयांचा माल चोरीला गेला केला. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा