उदगीर,
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा हाफ आयर्न मॅन पुरस्कार विजेते विवेक होळसंबरे, गोविंद रंगवाळ, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, प्रा . नितीन पाटील, ओ एस झेटिंग कांबळे, बालाजी मुस्कावाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक विवेक होळसंबरे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून दिले त्यामुळे त्यांची चांगली प्रगती झाली. केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. कमवा व शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन दिले.
पूढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आत्मसात करावेत. महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज व महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी कार्य केले.
विद्यालयातील विद्यार्थी अजिंक्य गायकवाड व आविष्कार सोळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे आहे. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकत नाही, हे जाणून कर्मवीरांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार केला.
कोल्हापूर येथील हाफ आयर्न मॅन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला म्हणून विवेक होळसंबरे व द्वितीय क्रमांक पटकावला म्हणून गोविंद रंगवाळ यांचा सैनिकी विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार विभाग प्रमुख प्रा युवराज दहिफळे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा . प्रदीप कोठारे, सुनील महिंद्रकर,नागेश पंगू, सर्वच हाऊस मास्टर, बालाजी कांबळे, विलास शिंदे, धनराज काटू यांनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा