नक्षलग्रस्त भागातील टॅक्सी ड्रायव्हर किरण कुर्मावार शिक्षणाठी‌ लंडनला! आमदार सचिन अहिर यांचे विशेष सहकार्य!*




    मुंबई दि.२३:.तीन वर्षांपासून टॅक्सी ड्राईव्हर म्हणून नशीब आजमावणारी नक्षलिस्ट गडचिरोली जिल्ह्यातील जिद्दी अभ्यासू किरण कुर्मावार नुकतीच शिक्षणा साठी‌ लंडनला रवाना झाली आहे! 

     हजारो प्रवाशांना गाव खेड्यातून तालुक्यात ने‌ आण करणारी किरण कुर्मावारने स्वप्नाच्या दिशेनं उंच भरारी‌ घेतलीय आणि ती सातासमुद्रापार असणाऱ्या लंडन शहराच्या दिशेनं रवाना झालीय. 

     लवकरच तिचं युनिव्हर्सिटी आँफ लिड्स येथे"इंटरनॅशनल मार्केटिंग अँन्ड मॅनेजमेंट " या विषयाचं पहिलं सत्र सुरु होतेय. किरण पुढील दोन वर्षे लंडनमध्ये राहून आपलं पद्व्युत्तर शिक्षण पुर्ण करील. 

    'रेगुंठा'या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत छोट्या दुर्गम खेड्यात टँक्सी ड्राईव्हर म्हणून किरण मागील तीन वर्षांपासून काम करत होती. वडिलांचा तीन वर्षांपूर्वी अपघात झाला आणि त्यानंतर तिने मित्राच्या मदतीने दारासमोर उभी असलेली टॅक्सी शिकून उपजिविकेला आरंभ केला.एकिकडे व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंब सांभाळतांना दुसरीकडे शैक्षणिक ओढीने तिनं हैदराबादच्या "उस्मानीया विद्यापीठा"मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात तिने अमेरिकेत पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विशाल ठाकरे दादाशी ओळख केली आणि दादाच्याच मदतीने तिने पदव्युत्तर शिक्षण परदेशी विद्यापीठातून घेण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज तिचं हे स्वप्न पूर्ण होत असल्याचं तिला पाहायला मिळत आहे. 

   किरणचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनाचे हात कामाला लागले. त्यात पहिली बातमी देणारे (एबीपी) लोकप्रिय वृत्त वाहिनीचे पत्रकार निलेश बुधवले यांनी बातमीच्या आधारे वृत्त चौफेर पोहोचविले. मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला.वाहिनीचे सक्रिय पत्रकार राजेंद्र कोचरेकर यांचीही या कामी साथ लाभली. 

    कोचरेकर यांनी बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेर यांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवली. सचिन अहिर यांनी हा विषय सभागृहात मांडला. नक्षलग्रस्त भागातून एक तरुणी विधायक मार्गाने शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहे आणि सरकार म्हणून आपण ती जबाबदारी पार पाडली पाहिजे,अशी विनंती केली. 

     मुख्यमंत्र्यांशी बोलून शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी केलेली मदत केव्हाही विसरता येणार नाही. किरणचं गाव नक्षलवादी चळवळीचं केंद्रबिंदू असलेल्या भागापासून खूप जवळ आहे. अशा ठिकाणी दररोज ८० किलोमीटर प्रवासी वाहतूक करणं नक्कीच सोप्प नव्हतं.  

    किरणची पदव्युत्तर शिक्षणासाठीची परदेशी शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि परदेशात जाण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे विजा पासपोर्ट मुख्य म्हणजे लंडनचा प्रवासखर्च,आमदार सचिन आहिर यांनी कुठेही गाजावाजा न करता कर्तव्यभावनेने पार पाडला. 

   लोकप्रतिनिधी म्हणून ज्या जबाबदारीने सचिन आहिर यांनी आपली जबाबदारी पार पाडली,तितक्याच प्रामाणिकपणे राजेंद्र कोचरेकर आणि एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावळे यांनी आपले नैतिक जबाबदारी पार पाडली.ही बातमी शासन दरबारापर्यंत पोहोचवण्या साठी विशेष परिश्रम घेतले.या कामात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.या सर्व मदतीचा परिपाक म्हणजे एक नक्षलिस्ट गडचिरोलीतील गरीब होतकरू तरुणी इंग्लंड मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

टिप्पण्या