सैनिकी विद्यालयात डॉ.माधव चंबुले यांचे व्याख्यान संपन्न


उदगीर,

श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ. माधव चंबुले यांचे व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे प्रमुख जनरल सर्जन डॉ . माधव चंबुले , पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के , बालाजी मुस्कावाड, प्रा. नितीन पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. माधव चंबुले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय ठरवून, त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण व आरोग्य यांची सांगड विद्यार्थ्यांनी घालून आपले करिअर करावे. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योगा करावा. सैनिकी विद्यालयाचा परिसर अतिशय रमणीय आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले,

 डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देत असताना रुग्णांच्या मानसिकतेचा विचार करणे आवश्यक आहे. 

अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, डॉ. माधव चंबुले हे एक उत्कृष्ट व तज्ञ डॉक्टर आहेत. सामाजिक जाणीव , सहानुभूती, संयम, शांतता इ. गुण असलेले डॉ.चंबुले आहेत. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार श्रीकांत देवणीकर यांनी मानले ‌ यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश पंगू, श्रीकांत देवणीकर, बालाजी मुस्कावाड, संतोष चामले, सतीश जगताप, प्रल्हाद येवरीकर, शिवकुमार कोळ्ळे, उमाकांत नादरगे , प्रा. नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या