उदगीर,
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ. संजय कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, प्रसिद्ध कान, नाक व घसा तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बसवराज म. पाटील नागराळकर साहेब आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, संजय कुलकर्णी हे एक चांगले डॉक्टर तर आहेतच त्यासोबतच ते एक साहित्यिक देखील आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले, विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कानात, नाकात विनाकारण बोटे घालू नये त्यामुळे विविध आजार होतात. सैनिकी विद्यालयाचा परिसर पाहून मी भारावून गेलो आहे. कान, नाक व घसा यांची काळजी कशी घ्यावी? याची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. संजय कुलकर्णी यांचा अल्पपरिचय बालाजी मुस्कावाड यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार श्रीकांत देवणीकर यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश पंगू, श्रीकांत देवणीकर, बालाजी मुस्कावाड, संतोष चामले, सतीश जगताप, प्रल्हाद येवरीकर, शिवकुमार कोळ्ळे यांनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा