समता साहित्य अकॅडमी वतीने सज्जन जैस्वाल यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान*




पुर्णा (. ‌‌. )समता साहित्य अकॅडमी यांच्या वतीने दिनांक 17/09/2023 रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता अकॅडमी चे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एस. तांडेकर , समता साहित्य विभागाचे अध्यक्ष अरुण राऊत , नागपूर साहित्य अकॅडमीचे आयोजक सुमेधा कांबळे, लखनऊ माजी शिक्षण मंत्री डी. एस‌ .वर्मा यांच्या हस्ते नागपूर येथे द्वारकामाई हॉटेल मध्ये आदर्श राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सज्जन हिरालाल जयस्वाल (सहशिक्षक विद्या प्रसारिणी सभा पूर्णा) यांना सन्मान चिन्ह , शाल व राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

      गेल्या वीस वर्षापासून सतत क्रीडा साठी अहोरात्र धडपड करणाऱ्या क्रीडा शिक्षक सज्जन जयस्वाल सर यांनी लंगडी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले तसेच राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत सतत तीन वर्ष महाराष्ट्र संघास प्रथम क्रमांकावर ठेवले व अनेक राष्ट्रीय खेळाडू लंगडी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे याची दखल घेऊन समता साहित्य अकॅडमी यांनी राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.

या पुरस्कार बद्दल संस्थेचे अध्यक्ष डी. आर. वाघमारे भीमरावजी कदम, श्री निवासजी काबरा, विजयकुमार रुद्रवार, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, बी. बी. मोरे, रणमाळ साहेब उमाटे सर आतिया मॅडम, एस. आर .हिंगणे ,सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी सर्व क्रीडा शिक्षक मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले

टिप्पण्या