कोलकत्ता येथील दुर्गापुर शहरांमध्ये स्टील अँड मेटल इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्टील उद्योगातील कामगारांचे अधिवेशन हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी दुर्गापूर येथील नेताजी भवन सभागृहात संपन्न झाले.
अधिवेशन प्रसंगी हरभजन सिंग सिद्धू यांच्या हस्ते झेंडावंदन करून, शहीद झालेल्या कामगारांना मान्यवर कामगार नेत्यांच्या हस्ते पुष्पचक्र. वाहण्यात आले. दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, देश धोक्यात आहे. कामगार कायदे बदलल्यामुळे कामगार संघटनांसमोर अनेक आव्हाने आहेत. मालकधार्जिणे कायदे बनवल्यामुळे आपणाला तीव्र संघर्ष करावा लागेल. त्यासाठी दिल्लीत ११ केंद्रीय कामगार संघटना व ५०० शेतकरी संघटना एकत्रित आल्या असून केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणाविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या देशाचा कामगार हा निर्माण करता असून, शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतातील सर्व शेतकरी व कामगार संघटना एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा काळया फिती लावून निषेध करणार आहेत. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. प्रास्ताविक भाषणात स्मेफीचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन सांगितले की, येणारा काळ कठीण असून, सार्वजनिक उद्योगधंद्यांमध्ये कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चालली आहे. समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे. यासाठी आपणास लढा उभारावा लागेल. नवीन पेन्शन योजना रद्द करून, सर्व कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. चार लेबर कोर्ट रद्द करावे. किमान वेतन ३६ हजार रुपये मिळाले पाहिजे. रिकाम्या सर्व जागा ताबडतोब भराव्यात. इत्यादी मागण्यासाठी आपणास एकजुटीने लढा द्यावा लागेल. स्मेफीचे अध्यक्ष एस.डी. त्यागी यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले की, कामगार चळवळीसमोर अनेक आव्हाने आहेत. भविष्यात कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी व कामगार यांची भक्कम एकजूट झाली पाहिजे. या लढ्यात युवा आणि महिलांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. याप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग, महिला नेत्या संज्योत वढावकर, उपाध्यक्ष विद्याधर राणे आदी कामगार नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्मेफीचे पदाधिकारी आणि दुर्गापूर स्टील प्लांट परमनंट एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुकांता रक्षित यांनी स्वागत केले. अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे. कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. महिलांवरील अन्याय दूर झाले पाहिजे. इत्यादी ठराव संमत करण्यात आले. या ठरावावर विविध राज्यातील कामगार प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. अधिवेशनात अध्यक्ष एस. डी. त्यागी, जनरल सेक्रेटरी संजय वढावकर व कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग यांची बहुमताने निवड करून, उर्वरित उद्योगनिहाय कार्यकारिणी बनविण्याचे अधिकार सभागृहाने त्यांना दिले. शेवटी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकरी व कामगार एकजुटीने लढा देणार आहे, या लढ्यामध्ये सर्व कामगारांनी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उमाकांत मिश्रा, एच . एस.मिश्रा, सुरेंद्र लाल, मुमताज, एस.के.पांडे तसेच स्थानिक सीटू, आयटक, इंटक, बीएमएस या केंद्रीय कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यास दोन हजार कामगार तर प्रतिनिधी संमेलनास तीनशे कामगिरी प्रतिनिधी हजर होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा