मुंबई दी.२: कन्नमवार नगर मधील सामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारे निष्ठावंत कॉंग्रेस कर्यकर्ते हरपले, अशा भावपुर्ण शब्दांत सामाजिक नेते बाळकृष्ण बने यांनी कन्नमवार नगर येथील दिवंगत कार्यकर्ते नारायणराव मोहिते यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.नारायण मोहिते यांचे अलिकडेच अल्पशा आजाराने निधन झाले.तेथील संबोधिनी हॉल येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
नारायण मोहिते यांनी कॉंग्रेसच्यानेत्या अलका देसाई यांच्या सोबत कन्नमवार नगर मधील खोल्यांचे घरभाडे कमी केले, पिण्याच्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी मोठा लढा उभा केला.त्याच प्रमाणे कन्नमवार नगर मधील अनेक गरजू लोकांना अधिकृतपणे स्टॉल उभारणीला सहकार्य करुन, रोजगाराला संधी प्राप्त करुन दिली,अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी नारायण मोहिते यांच्या
सामाजिक कार्याला उजाळा दिला.सर्वश्री सरनोबत,निवृत्ती देसाई,अण्णा शशिर्सेकर,
कन्या मनिषा आदींची भाषणे झाली.नारायण मोहिते यांचे बंधू राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.***
addComments
टिप्पणी पोस्ट करा