29 सप्टेंबर, राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १ हजार खेळाडूंचा सहभाग* स्व. रमेश (रामलू )पारे यांच्या स्मरणार्थ



नांदेड दि. 27 -

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त स्व. रमेश (रामलु) पारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि. 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत तिसर्‍या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रविण लुंडक ,राज्य चिटणीस यतिन टिपणीस, सचिव ॲड अशितोष पोतणीस, कोषाध्यक्ष संजय कडू,कुलजितसिंग दरोगा, विभागीय सचिव गणेश माळवे उपस्थित राहणार आहेत ‌.ही स्पर्धा गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, जिल्हा क्रीडा संकुल, इन्डोर हॉल येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जवळपास 1 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.सदरील स्पर्धा प्रकाश झोतात व आठ टेबल वर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मान चिन्ह, प्रमाणपञ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

            नांदेड जिल्ह्यातील सर्व क्रीडा प्रेमींनी या राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, सचिव डॉ. अश्विन बोरीकर , व संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

----------------------------------

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज