प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
निर्भीड पत्रकारिता करणारे पत्रकारांवर नेहमीच खंडणी सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र न्यायालयात बाळु पाठक सारख्या निर्भिड पत्रकारांना न्याय मिळतोच हे न्यायालयाच्या निकालानंतर सिद्ध झाले आहे. हिंगोली दिनांक 09/08/2023 रोजी मा.जिल्हा व सत्र न्यायधीश नांदेड श्री.एस.ई. बांगर साहेब यांनी हिंगोली जिल्हातील प्रसिद्ध पत्रकार, तात्कालीन E-TV चे पत्रकार बाळू ऊर्फ बालाजी पाठक व ईतर यांची खंडणी खटल्यातुन निर्दोष मुक्तता केलेली आहे.
या बाबतची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी बालाजी पांडुरंग घाडगे ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. बोथी ता. कळमनुरी जि. हिंगोली यांनी हिंगोली येथील प्रसिध्द पत्रकार, तात्कालीन E-TV चे पत्रकार बाळु ऊर्फ बालाजी पाठक यांच्या विरुध्द फिर्याद मध्ये आरोप लावले होते कि ग्रामीण रोजगार योजणा सन 2001-02 मधिल गावाच्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला सदरील घोटाळा पेपर मध्ये छापून बदनामी करण्याच्या भिती दाखवून पैश्याची मागणी केली सदरील प्रकरणात पो. स्टे.वजिराबाद नांदेड येथे कलम 384,34 भा.द.वि.अन्वये गुन्हा दाखल करून कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदरील प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने बाळु ऊर्फ बालाजी पाठक यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर फिर्यादी यांने मा. जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशा विरुध्द अपिल सादर केली सदरील प्रकरण हा अती-तटीचे होते .अँड जे.एस. पठान हिंगोली यांनी सदरील प्रकरणात बाळु ऊर्फ बालाजी पाठक यांच्या तर्फे मा. न्यायालया समोर युक्तीवाद केला आणि मा. न्यायालयाने बाळू ऊर्फ बालाजी पाठक यांच्या वतीने केलेल्या युक्तीवादाला विचारात घेवुन फिर्यादीने दाखल केलेली अपिल फेटाळून लावली आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून बाळू ऊर्फ बालाजी पाठक यांची निर्दोष मुक्तता केली आहे. बालाजी ऊर्फ बाळु पाठक यांच्या वतीने मा. जिल्हा व सत्र न्यायधीश नांदेड यांच्या समक्ष अँड जे. एस.पठाण हिंगोली यांनी सक्षम बाजु मांडुण युक्तीवाद केला. व त्यांना अँड विजय राऊत, अँड सिराज एस. पठाण, अँड जे जे सय्यद यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा