राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन संपन्न* .

 


    श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य अतिथी वक्ते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सहाय्यक अधिष्ठाता ,प्रा. डॉ. विकास सुकाळे सर उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक रुपरेखा प्रा. डॉ. विजयसिंह ठाकूर यांनी केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. राजेश्वर कोटलवार, प्रा .डॉ. राहुल धावरे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या अनुषंगाने अमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सुकाळे सर यांनी सांगितले .आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अबलबजावणीसाठी जनमानसात या धोरणाविषयी माहिती मिळावी .बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणात कोणते विषय घेता येतील .क्रेडिट्स कशा पद्धतीने असणार आहेत, परीक्षा पद्धती , मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट ,कौशल्य आधारित शिक्षण अभ्यास पद्धती याविषयी सविस्तर माहिती सांगितली . स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती मुंगल यांनी केले .तर आभार प्रा. बालाजी जाधव यांनी मांनले .यावेळी प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या