सेलू(. ) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सेलू तालुका क्रीडा अधिकारी व पंचायत समिती सेलू वतीने सेलू तालुका शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धा दिनांक 28 ऑगस्ट रोजी न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे स्पर्धा आयोजन करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रम चे उद्घाटक यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक साईराज भैय्या बोराडे होते तर तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक गणेश माळवे, मुख्याध्यापक जीवन बोराडे, अमर सुरवसे यांची उपस्थिती होती.
साईराज बोराडे म्हणाले शालेय जीवनात बुध्दीबळ क्रीडा स्पर्धा भविष्यात यशस्वीरीत्या जीवनाचा मार्ग आहे. खेळाडूंनी सातत्याने क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
१४,१७,१९, वर्षे मुले /मुली च्या तालुक्यातील १२ शाळांतील १२९ खेळाडू सहभागी झाले होते.
पंच म्हणून सचिन शहाणे , शुभम शहाणे,रासकटला वाणीश्री हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , सौ.लता नावाडे यानी केले तर सगीर फरोकी ने आभार मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा