संविधानाचे रक्षण करण्याचा संकल्प करू! -सचिन अहिर


  मुंबई दि.९ : स्वातंत्र्य लढ्याच्या भूमीवरील मातीला स्पर्श करून देशाच्या संविधान रक्षणाचा संकल्प करू,अशा भावपूर्ण शब्दांत अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे आज हुतात्म्यांना अभिवादन केले.

    राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त, नानाचौक येथून गवालिया टॅंक मैदाना पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. गवालिया टॅंक मैदानावरील पहुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गिरणी कामगारांचा हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मूकमोर्चात अन्य कारखाने, आस्थापने आणि उद्योगातील कामगार सहभागी झाले होते.महिला कामगारही मोठ्या संख्येने अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.मूकमोर्चा गवालिया टॅंक मैदानावर आल्यावर तेथील हुतात्मा स्मारकाला अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आली.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, उत्तम गिते, किशोर रहाटे,साई निकम आदि पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, गेल्या पन्नास वर्षापूर्वी पासून उन असो, पाऊस असो, हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे कर्तव्य गिरणी कामगार निष्ठेने पार पाडीत आले आहेत. स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तांनी केलेला त्याग महत्त्वाचा ठरला आहे, असे सांगून,सचिन अहिर यांनी गवालिया टॅंक मैदाना वरील १९४२ च्या लढ्यात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना "चले जाव! चा नारा दिला,त्या ऐतिहासिक आठवणींना आपल्या भाषणात उजाळा दिला.*******

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज