गढूळ राजकारणा मूळे देश मागे पडू‌ लागलाय!आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली खंत रामिम संघ ध्वजारोहण प्रसंगी*


     मुंबई दि.१५:आज गढूळ राजकारणा मुळेच देश मागे पडत चलला आहे‌ आणि राज्यही मागे पडू लागले आहे.तेव्हा असलेले वाद मिटवणार की वाढवणार? ‌तिरंग्या साठीच तर सारा देश एकत्र आला आणि स्वातंत्र्य,लोकशाही प्राप्त झली.तेव्हा तिरंगा हीच आपली खरी शक्ती आहे,हे विसरून चालणार नाही,असे प्रतिपादन यूवासेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

      राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मजदूर मंझील मधील प्रांगणात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडले.संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.

    आज जाती-जातीमध्ये ,धर्मा-धर्मात वाद निर्माण केला जात आहे.पण सर्व देश वासियांना ठाऊक आहे,या देशाला शूर‌‌ वीरांच्या त्याग‌ आणि ‌बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे. हिंदुस्थानच्या आखंडतेसाठी आत्मबलिदान देणा-या वीरांचा त्याग ते‌ कदापि‌‌ वाया जावू देणार‌ नाहीं, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, येथील गिरणी कामगार देशाचा कणा आहे आणि हीच मंबईची खरी ओळख आहे,हा इतिहास सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, हुकूमशाही काय असते?हे येथील जनता ओळखून आहे.त्यावर आज बोलणे बरोबर नसले तरी जनता आणि आजच्या पिढीला ते सारे ज्ञात आहे,असेही आदित्य ठाकरे म्हणाले.सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या विविध कामावर प्रकाशझोत टाकला.खासदार अरविंद सावंत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आजच्या झेंडावंदन कार्यक्रमात गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.महिला कामगार आणि आंबेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्ण शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, मिलिंद तांबडे, सेक्रेटरी शिवाजी काळे, किशोर रहाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.••••••

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज